1. इतर बातम्या

सहा वर्षात जनधन योजने अंतर्गत ४० कोटी लोकांनी उघडली खाती; जाणून घ्या! फायदे

जनधन योजना ही संपूर्ण चित्र बदलणारी योजना ठरली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाचे बँकेत खाते असावे, अशी इच्छा व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरु केली. या योजनेला २८ ऑगस्टला सहा वर्ष पूर्ण झाले असून या सहा वर्षात ४० कोटी बँक खाते उघडण्यात आली आहेत.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


जनधन योजना ही संपूर्ण चित्र बदलणारी योजना ठरली आहे.  देशातील प्रत्येक नागरिकाचे बँकेत खाते असावे, अशी इच्छा व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरु केली. या योजनेला  २८ ऑगस्टला सहा वर्ष पूर्ण झाले असून या सहा वर्षात  ४० कोटी बँक खाते उघडण्यात आली आहेत. या योजनेनच्या लाभार्थींमध्ये  ६३ टक्के  लोक ग्रामीण भागातील आहेत. त्यात महिलांचे प्रमाण ५५ टक्के आहे. लाभार्थींना सरकारतर्फे  मिळणारी मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करणे या योजनेमुळे शक्य झाले आहे. 

दरम्यान या योजनेला  सहा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त  पंतप्रधान  नरेंद्र मोदींनी  एका ट्विटमध्ये म्हटले आहे कीज्याची विशेषत गरीब वर्गातील ज्या लोकांची बँकांमध्ये खाती नाहीत, त्यांची खाती उघडण्याचा आणि त्यांना बँक व्यवहारांच्या कक्षेत आणण्याच्या उद्देशाने पंतप्रधान जनधन योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. या योजनेने पूर्वीचे सारे चित्रच बदलून टकाले आहेत.  गरिबी निर्मूलनासाठी चाललेल्या प्रयत्नांना जनधन योजनेमुळे बळकटी  मिळाली.  त्याचा करोडो लोकांना फायदा झाला.  २०१४  साली पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी जनधन ही महत्त्वकांक्षी  योजना अंमलात आणली होती.

दरम्यान या योजनेतून अनेक फायदे लाभार्थींना मिळत आहेत. पंतप्रधान जन धन योजनेतून उघडलेले हे एक बचत खाते आहे, पण इतर बचत खात्यांपेक्षा या खातेतून आपल्याला अधिक सुविधा मिळतात. जनधन खात्यातून इतर सुविधा मिळण्यासह आपल्याला खाते उडल्यानंतर ३० हजार रुपयांचा बिमा देखील मिळतो. यासह २ लाख रुपयांच्या अपघाती विम्यातील डेथ कव्हर विमा आणि ५ हजार रुपयांचा ओवरड्राफ्टची सुविधाही मिळते, जी इतर बचत खात्यांमध्ये मिळत नाही. जर आपल्या खात्यात शुन्य रुपये बाकी असेल तरीही आपण ओव्हरड्राफ्टच्या सुविधेतून ५ हजार रुपये काढू शकतात. यासाठी फक्त एक अट आहे, ती म्हणजे जनधन खाते पीएमजेडीवाय, आधारकार्डशी लिंक असावे.

 


ओव्हरड्राफ्ट सुविधा कशी वापरू शकता - या सुविधेचा फायदा तुम्ही कसा घेऊ शकता हा प्रश्न सहज आपल्या मनात येतो. काळजी करु नका आम्ही याचे उत्तर ही देत आहोत, आपले खाते हे साधरण सहा महिने जूने असावे. या सहा महिने जुन्या खात्यात पैसे होते आणि आपण वेळोवेळी व्यवहार केलेले पाहिजे.  जनधन खाते उघडण्यासाठी आपल्याला जास्त कागदपत्रांची गरज नसते. आपण आपले मुळ काही कागदपत्रे घेऊन जरी बँकेत गेलात ततरी आपले खाते उघडण्यात येईल.

English Summary: In six years, 40 crore people opened accounts under Jan dhan Yojana Published on: 29 August 2020, 03:25 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters