पॅन कार्डप्रत्येक भारतीय नागरिकाला साठी आवश्यक ओळखीचे दस्तऐवज आहे.करण व्यवस्थापनासाठी चे एक महत्त्वाचे कागदपत्र असून कुठल्याही प्रकारच्या सरकारीनिमसरकारी काम पॅन कार्ड शिवाय पूर्ण होऊ शकतनाही.पॅन कार्ड म्हणजे परमनंट अकाऊंट नंबर.हा नंबर प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळा असतो.
त्यामुळे संबंधित व्यक्तीने केलेले कुठलीही आर्थिक व्यवहार आयकर विभागाला सहज ओळखता येतात. या लेखात आपण पॅन कार्ड वापरताना कोणती काळजी घ्यावी? तसेच दोन पॅन कार्ड असतील तर काय होऊ शकते? याबद्दल माहितीघेऊ.
चुकून दोन पॅन कार्ड असतील तर काय करावे?
आपण बऱ्याचदा पॅन कार्डसाठी अर्ज करतो.परंतु अर्ज केल्यानंतर ही पॅन कार्ड येत नाहीकिंवा ते वेळेवर येत नाही.त्यामुळे बऱ्याचदा आपण दुसऱ्यांदा अर्ज करतो.त्यामुळे अगोदर केलेला अर्जआणि दुसऱ्यांदा केलेला अर्ज यामुळे दोन कागदपत्रे आपल्याकडे येऊ शकतात.अशी कागदपत्रे आपण स्वतःजवळ तशीच ठेवतो. पण असे करणे महागात पडू शकते.कारण पॅन कार्ड च्या बाबतीत हेजर एकाच व्यक्तीने दोन पॅन कार्ड जवळ बाळगले तर हा मोठा गुन्हा असून त्यासाठी दंड होऊ शकतो.
चुकीमुळे दुसरे पॅन कार्ड आले तर काय करावे?
घरी दोन पॅन कार्ड आलेले असल्यासत्यातील एक कार्ड सरेंडर करावी लागते.त्यासाठी ही प्रक्रिया सोपी आहे. त्यासाठी प्रथम प्राप्तीकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन सामान्य फॉर्म डाउनलोड करावा.हा फॉर्म भरून कुठल्याही एन एस डी एल कार्यालयात तो सबमिट करावा.जेव्हा तुम्ही हा फॉर्म सबमिट कराल तेव्हा त्यासोबत दुसरे पॅन कार्ड देखील सबमिट करावे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करता येते.
दोन पॅन कार्ड नसतील तर दहा हजारांचा दंड होऊ शकतो-
1-पॅन कार्ड मधील दहा अंकी क्रमांक काळजीपूर्वक भरावा.
2-
तो पुन्हा तपासा चुकीची माहिती भरल्यास 10 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
3-इन्कम टॅक्स रिटर्न भरताना पॅन नंबर योग्यरीत्या प्रविष्ट करावा आणि पुन्हा तपासावा.
4चुकीची माहिती देणाऱ्या व्यक्ती वर आयकर कायदा 1961 च्या कलम 272Bअंतर्गत आयकर विभाग ठोठाऊशकते.दोन पॅन कार्ड ठेवल्यास दहा हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो.बँक खाती गोठवली जाऊ शकतात.त्यासाठी तुमच्याकडे असलेले एक कार्ड सरेंडर करणे आवश्यक आहे.
Share your comments