1. इतर बातम्या

जन धन खात्याशी आधार लिंक नसल्यास होणार १.३० लाख रुपयांचे नुकसान

जर तुम्ही जनधन बँक खातेही उघडले असेल तर तुमचे खाते आधार कार्डशी लिंक करा. नाहीतर तुम्हाला १.३० लाख रुपयांचे नुकसान होऊ शकते. सरकारकडून या खात्यांमध्ये ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. हे बँक खाते झिरो बॅलन्स बचत खाते आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


जर तुम्ही जनधन बँक खातेही उघडले असेल तर तुमचे खाते आधार कार्डशी लिंक करा. नाहीतर  तुम्हाला १.३०  लाख रुपयांचे नुकसान होऊ शकते. सरकारकडून या खात्यांमध्ये ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. हे बँक खाते  झिरो बॅलन्स बचत खाते आहे. या व्यतिरिक्त यामध्ये ओव्हरड्राप्ट आणि रुपे कार्डसह अनेक सुविधा दिली जाते.या खात्यातील ग्राहकांना रुपये डेबिट कार्ड देण्यात येते. ज्यांमध्ये अपघाताचा  १ लाख रुपयांचा विमा दिला जातो. मात्र, तुमचे हे खाते आधार कार्डसोबत लिंक केले नाही तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. म्हणजेच तुम्हाला थेट एक लाख रुपयांचे नुकसान होईल.

हेही वाचा : जनधन खातेधारकांसाठी बँकांनी घेतला हा मोठा निर्णय;  खातेधारकांनना मिळाला दिलासा

याशिवाय या खात्यावर तीन हजार रुपयांचा अपघाती मृत्यू विमा संरक्षण दिले जाते.हे विमा संरक्षण आधार कर्ज बँक खात्याशी लिंक झाल्यानंतर उपलब्ध होते.त्यामुळे तुम्ही त्वरीत आपले खाते आधार कार्डशी लिंक करा. तुम्ही बँकेत जाऊन खात्याला आधारशी लिंक करु शकता.बँकेत तुम्हाला आधार कार्डची एक फोटो कॉपीतुमचं पासबुक घेऊन जावे लागले. अनेक बँका मेसेजच्या माध्यमातून खात्याला आधारकार्ड लिंक करत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरुन  मेसेज बॉक्समध्ये जाऊन युआयडी  आधार नंबर खाते नंबर लिहून ७५६७६७ पाठवू शकतात.यानंतर त्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक केले जाईल. जर तुमचा आधार आणि बँकेत दिलेला मोबाईल नंबर वेगळा असेल तर लिंक होणार नाही. याशिवाय तुम्ही बँक खात्याला तुमचा जवळच्या एटीएममधूनही आधारशी लिंक करु शकतात.

याप्रकारे काढता येतात पाच हजार रुपये

पंतप्रधान जनधन खात्यावर ग्राहकांना पाच हजार रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळते. ओव्हरडाफ्ट्रच्या  सुविधेचा लाभ घेण्यासाठी  आधार कार्ड असणे आवश्यक आहे. याशिवाय पीएमजेडीवाय खातेही आधार कार्डशी लिंक केले पाहिजे. या योजनेंतर्गत पंतप्रधान  नरेंद्र मोदींचा उद्देश प्रत्येक कुटुंबासाठी बँक खाते उघडणे हा होता.

 


कसे उघडणार खाते

तुम्हाला नवीन जन धन खाते उघडायचे असल्यास जवळच्या बँकेत जाऊन तुम्ही हे काम सहजपणे करू शकता. यासाठी तुम्हाला बँकेत फॉर्म भरावा लागेल. त्यामध्ये नाव, मोबाईल नंबर बँकेच्या शाखेचे नाव, अर्जदाराचा पत्ता. नॉमिनी, व्यवसाय  नोकरी आणि वार्षिक उत्पन्न  आणि तुमच्यावर अवलंबून राहणाऱ्यांची  संख्या, एसएसए कोड किंवा प्रभाग क्रमांक, गाव किंवा शहर कोड इत्यादी  माहिती द्यावी लागेल.

English Summary: If Aadhar is not linked with Jandhan account, there will be a loss of Rs 1.30 lakh Published on: 11 November 2020, 04:58 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters