शेतकऱ्यांसाठी सरकार विविध योजना राबवत असते. सध्या मोदी सरकारची पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना खूप लोकप्रिय झाली आहे. कोट्यवधी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. आता या योजनेच्या लाभार्थ्यांना सरकार मोठी भरघोस मदत करणार असून सरकार या योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक ४२ हजार रुपयांची आर्थिक मदत करणार आहे. जर तुम्ही शेतकरी आहात आणि तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर केंद्र सरकार तुमच्या बँक खात्यात ४२ हजार रुपये हस्तांतरण करणार आहे.
कशाप्रकारे मिळतील ४२ हजार रुपये
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपयांची मदत केली जाईल. तर बाकी असलेले ३६ हजार रुपये सरकार पीएम किसान मानधन योजनेच्या अंतर्गत देणार आहे.
काय आहे पंतप्रधान शेतकरी मानधन योजना
(What is PM Kisan Maandhan Yojana?)
पंतप्रधान शेतकरी मानधन योजना छोटे आणि अल्पभुधारकांना मासिक पेन्शन देणारी ही योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत तीन हजार रुपये मासिक पेन्शन म्हणजे ३६ हजार रुपये दिले जाते. अशात जर तुम्ही पीएम किसान निधी योनजेचा फायदा घेत असाल तर या योजनेतून मिळणारी रक्कम मानधन योजनेत वळवू शकतात. जर तुम्ही पीएम किसान योजनेत आपले नाव नोंदविले नसेल तर आपल्याला वयाच्या १८ व्या वर्षापासून ते ४० वर्षापर्यंत पैसे गुंतवावे लागतात. यात तुम्ही कमीत - कमी ५५ रुपये महिना किंवा जास्तीत जास्त २०० रुपयांची गुंतवणूक करू शकतात.
Share your comments