गुढीपाडवा हिंदू धर्मात (Hindu) खूप महत्वाचा सण आहे. गुढी पाडवा (Gudi Padwa) हा हिंदू नववर्षाचा प्रारंभ मानला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक. गुढी उभारुन नव्या संकल्पाचा शुभारंभ केला जातो. महाराष्ट्रात हा सण खास पद्धतीने साजरा केला जातो.
गुढीपाडव्याचा मुहूर्त
फाल्गुन अमावास्या 1एप्रिल 2022 रोजी सकाळी 11वाजून 53 मिनिटांनी संपलेल. तेव्हा अमवास्या संपल्यानंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल आणि दुसऱ्या दिवशी 2 एप्रिल 2022 च्या रात्री 11 वाजून 58 मिनिटांपर्यंत राहील. तिथीनुसार हा उत्सव 2 तारखेला साजरा केला जाईल. या दिवशी अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हे दोन्ही योग अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जातात.
अशी उभारावी गुढी
१. गुढी उभारण्यासाठी आपण जी काढी घेतो ते प्रथम स्वच्छ धुवून, पुसून घ्या.
२. त्यानंतर त्याला एक रेशमी वस्त्र बांधून त्यावर एक चांदी, तांब्या किंवा अन्य कोणताही स्वच्छ तांब्या ठेवा.
३. गुढीभोवती रांगोळी काढावी. त्यानंतर हा तांब्या व वस्त्र गुढीला व्यवस्थित बांधून घ्या.
४. या तांब्यावर मग कडुनिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्या बांधाव्यात. तसंच साखरेची माळ बांधावी.
५. गुढी उभारल्यानंतर त्यावर हळद, कुंकू, फुले वाहून तिची पुजा करावी.
६. तसंच उभारलेली गुढी सूर्यास्तापूर्वी पुन्हा नमस्कार करुन उतरवावी.
महत्त्वाच्या बातम्या :
खरीप हंगामातील खतांच्या संकटावर मात करण्यासाठी कृषी विभाग उतारले मैदानात
जिल्हा बॅंकेने कर्जमर्यादा वाढवली; आता शेतकऱ्यांना एकरी मिळणार 'इतके' वाढीव कर्ज
गुढी पाडव्याचे महत्व
भारतातील विविध राज्यांमध्ये इतर वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. गुढी पाडव्याच्या दिवशी स्त्रिया घरामध्ये सुंदर गुढी उभारून, तिची पूजा करतात. असे मानले जाते की, गुढी घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख-समृद्धी नांदते.
महत्त्वाच्या बातम्या :
Wheat Allergy: गव्हाची चपाती खाल्ल्याने 'या' लोकांना होते अॅलर्जी, हळूहळू ही लक्षणे जीव घेतील!
पठ्याने! आता तर हद्दच केली; अंगणातच लावले गांजाचे झाड
Share your comments