1. इतर बातम्या

महत्वाचे!आत्मा योजनेअंतर्गत करा शेतकरी गटाची स्थापना आणि नोंदणी

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजनाराबवित असते. या योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घेऊन शेती संबंधित उद्योग,पशुसंवर्धन,मत्स्य पालन व्यवसाय तसेच दुग्ध व्यवसाय यादीमध्ये शेतकऱ्यांना प्रगती करणे सोपे होते. तसे पाहायला गेले तर महाराष्ट्र शासनाच्या सगळे योजनांची प्राधान्य ते प्रथम शेतकरी गटाला दिले जाते.विविध उद्योगात बाबतीतली प्रशिक्षण देणे,यासंबंधीचे अनुदान देणे इत्यादी बाबींचा लाभ दिला जातो.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
farmer group

farmer group

  शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजनाराबवित असते. या योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घेऊन शेती संबंधित उद्योग,पशुसंवर्धन,मत्स्य पालन व्यवसाय तसेच दुग्ध व्यवसाय यादीमध्ये शेतकऱ्यांना प्रगती करणे सोपे होते. तसे पाहायला गेले तर महाराष्ट्र शासनाच्या सगळे योजनांची प्राधान्य ते प्रथम शेतकरी गटाला दिले जाते.विविध उद्योगात बाबतीतली प्रशिक्षण देणे,यासंबंधीचे अनुदान देणे इत्यादी बाबींचा लाभ दिला जातो.

.शेतकरी गटांकडून प्रामुख्यानेशिवारातील संलग्न भौगोलिक क्षेत्रात सामूहिक शेती करणे, तसेच उत्पादित शेती उत्पादनावर प्रक्रिया व मूल्यवर्धन करणे शेतमालाच्या एकत्रित वीपनणासाठी  सामूहिक स्वरूपाची व्यवस्था निर्माण करणे या सगळ्या माध्यमातून गट समूहाचा  विकास घडवून आणणे या सगळ्या गोष्टी गट शेती किंवा समूह  शेतीमध्ये येतात.या लेखात आपण आत्मा योजनेअंतर्गत शेतकरी गटाची नोंदणी प्रक्रिया कशी करतात ते पाहू.

आत्मा योजनेचे प्रमुख उद्दिष्ट व हेतू

  • राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर पुनर्जीवित तसेच नव्याने स्वायत्त संस्था स्थापन करणे.
  • बहुउद्देशीय संस्थांना कृषीच्या विस्तारासाठी चालना देणे व पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत विस्तार सेवा पुरवठादारचा समावेश करणे.
  • विविध प्रकारच्या शेती पद्धतीचा अवलंब, एकात्मिक व सर्वसमावेशक कृषि विस्तार कार्यक्रम राबविणे तसेच राबवण्यात आलेल्या विस्तार कार्यक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी करणे.
  • शेतकऱ्यांच्या असलेल्या गरजा व त्यांच्या मागण्या या सगळ्या विचारात घेऊन त्यानुसार शेतकरी समूहांची व शेतकरी गटांची स्थापना करणे.
  • तसेच हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उभी करावी लागणारी संस्थात्मक व्यवस्थेसाठी व त्याला लागणारे मनुष्यबळ देण्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद व संभाव्य निधीबाबत याचे केंद्र व राज्य शासनाकडून नियोजन करणे.

आत्मा व्यवस्थापन समितीचे कार्य

  • जिल्ह्यातील विविध सामाजिक,आर्थिक समूह आणि शेतकऱ्यांना असणाऱ्या समस्या व अडचणी जाणून घेणे.
  • जिल्ह्याचे एकात्मिक संशोधन कृषि विस्तार नियोजन करणे तसेच लघु आणि मध्यम स्वरूपाचे तंत्रज्ञान प्रथम प्राधान्याने घेता येईल.
  • जिल्हा शेतकरी सल्ला समिति च्या मदतीने वार्षिक कृती आराखडा तयार करणे जो आत्मा नियामक मंडळासमोर आढावा देण्यासाठी व आवश्यक बदल करण्यासाठी तथा मंजुरीसाठी ठेवता येईल.
  • लेखापरीक्षणासाठी आवश्यक ते प्रकल्प लेखा जतन करणे.
  • तालुका तसेच गाव पातळीवर शेतकरी माहिती व सल्ला केंद्र स्थापन करणे  व त्या माध्यमातून एकात्मिक कृषि विस्तार व तंत्रज्ञान प्रसार कार्यक्रम राबवणे.
    • तसेच हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उभी करावी लागणारी संस्थात्मक व्यवस्थेसाठी व त्याला लागणारे मनुष्यबळ देण्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद व संभाव्य निधीबाबत याचे केंद्र व राज्य शासनाकडून नियोजन करणे.

     

  • नियमित कार्यवाही अहवाल प्रत्यक्ष लक्ष साध्या सह आत्मा नियामकमंडळात पाठवणे जो नंतर कृषी व सहकार मंत्रालस पाठवला जाईल.
  • आत्मा व्यवस्थापन समितीची जिल्ह्यातील विविध तालुक्याचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक महिन्यात एक आढावा बैठक घेणे व सदरील बैठकीचा अहवाल राज्य मुख्यालय कक्षास पाठविणे.

असा करावा अर्ज

 आपण आपल्या एक शेतकरी गट नोंदणी अर्ज भरून तो तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे जमा करायचा आहे.यामध्ये प्रामुख्याने ही वेगवेगळ्या प्रकारच्या पीकनिहायआणि कृषी उत्पादन निहाय शेतकरी यांचे गट तयार करणे अपेक्षित असते.शेतकरी गटांच्या सदस्यांची बैठक महिन्यातून किमान एक वेळा होणे अपेक्षित आहे. तालुक्यातील त्याच्या पिकांचे गट एकत्र येऊन गटांचा तालुकास्तरावर संघ करता येईल. तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्या मधील त्या त्या विशिष्ट पिकांचे गट मिळून शेतकरी उत्पादक कंपनी तयार करता येईल.शेतकरी गटांनी त्यांचे सर्व रेकॉर्ड, वेगवेगळ्या प्रकारच्या नोंदवह्या तसेच रजिस्टर व रेकॉर्ड ठेवणे आवश्यक आहे.

 

शेतकरी गटस्थापने साठी आवश्यक कागदपत्रे

  • गटाच्या प्रथम सभेचे इतिवृत्त
  • प्रत्येक सदस्यांचे वैयक्तिक अर्ज
  • गटातील प्रत्येक सदस्यांचा सातबारा व आठ चा उतारा
  • प्रत्येक सदस्याचे आधार कार्ड मतदान कार्ड
  • संबंधित गटाचा करारनामा
  • गट नोंदणी फी रुपये शंभर

अधिक माहितीसाठी आपल्या किंवा शेजारील गावांमधील गटाशी संपर्क करा तसेच तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे संपर्क करावा.

English Summary: establishment of farmer group by aatma yojana Published on: 26 September 2021, 11:14 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters