आनंद महिंद्रा भारतीय उद्योग जगातील एक चिरपरिचित नाव, नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील एका नवयुवकाणे आपल्या कौशल्याच्या जोरावर एक जुगाडू जीप तयार केली, या जुगाडू जिपच्या निर्मितीमुळे आनंद महिंद्रा खूप खुश झाले आणि त्यांनी ही जीप बनवणाऱ्या नवयुवकाला एक एसयुव्ही कार गिफ्ट केली. आनंद महिंद्राच्या या कार्याचे महाराष्ट्रातील नव्हे नव्हे तर देशातील अनेक लोकांनी त्यांचे मोठे कौतुक केले. आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप ॲक्टिव असतात, ते नेहमीच भारतीयांचे कौशल्य जगापुढे मांडण्याचे कार्य करतात, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर आनंद महिंद्रा जास्त सक्रिय असतात आणि आपला ट्विटमध्ये ते भारतीयांचे टॅलेंट जगापुढे घेऊन जातात आणि त्यामुळे अनेक भारतीयांना कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळत असते.
शनिवारी देखील आनंद महिंद्रा ने भारतातील एका अवलिया प्रतिभावान नवयुवकाचे इनोवेशन जगापुढे मांडण्यासाठी ट्विटरवर तीन ट्विट केले. आनंद महिंद्रा या अवलियाच्या इनोवेशन वर मोठे आनंदी दिसत होते, त्यामुळेच त्यांनी या नवयुवकाच्या इनोवेशनमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा जाहीर केली. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की बारा तारखेला अर्थात शनिवारी आनंद महिंद्रा यांनी गुरसौरभ नावाच्या व्यक्तीच्या एका डिवाइसचा व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडल वर पोस्ट केला. व्हिडिओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, सायकलला मोटारसायकल सारख बनवण्यासाठी जगात अनेक उपकरणे आहेत, पण ह्या माणसाची एक छोटे डिवाईस, चिखलात देखील काम करण्याची क्षमता ठेवते एवढेच नाही तर फोन चार्ज करण्याची सोय देखील यामध्ये देण्यात आली आहे म्हणुन हे डिवाईस खूप खास आहे. महिंद्रा यांनी पुढच्या ट्विटमध्ये लिहिले की, हा व्यवसाय नफा देईल की नाही माहित नाही, पण यात गुंतवणूक करणे माझ्यासाठी खरंच खुप अभिमानाचे असेल. गुरसौरभ यांच्याशी माझा कोणीतरी संपर्क करून द्या, अशी विनंती देखील त्यांनी ट्विटरवरून केली.
हे उपकरण आपल्या रेग्युलर सायकलला इलेक्ट्रिक सायकलमध्ये रूपांतरित करते. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी सायकलमध्ये कोणताही बदल करण्याची गरज नाही. याचा अर्थ, सायकलच्या रचनेत तुम्हाला कोणतेही बदल करावे लागणार नाहीत किंवा तुम्हाला यासाठी कोणतेही आधिक कार्य करावे लागणार नाही. हे यंत्र सायकलच्या पेडलला सहजपणे जोडता येते त्यामुळे सायकल चालवणे कठीण राहणार नाही आणि यामुळे सायकल चाळविणे मजेदार बनणार आहे. आनंद महिंद्राने यांनी शनिवारी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला आहे की, या 'अपनी स्वदेशी सायकल'ची बॅटरी 20 मिनिटे पेडल मारल्यानंतर 50% चार्ज होते. हे उपकरण सायकलला कमाल 25 किलोमीटर प्रतितास वेग देण्यास सक्षम आहे. शिवाय, या यंत्राची सर्वात मोठी विशेषता म्हणजे एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर, ह्या यंत्रद्वारे 40 किलोमीटरपर्यंत सायकल चालवली जाऊ शकते आणि यामुळे 170 किलोग्रॅमपर्यंत सायकल वजन खेचू शकते. या व्हिडिओमध्ये हे उपकरण खूप मजबूत असल्याचा दावा केला आहे. हे उपकरण अग्नी, पाणी आणि चिखलाचाही टाकले तरी त्यावर काहीही परिणाम होत नाही, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोबाईल चार्जिंगचीही सुविधा या उपकरणात देण्यात आली आहे.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गुरसौरभ सिंह यांनी 'अपनी स्वदेशी सायकल' उपकरणाचा शोध लावला आहे. त्यांच्या कंपनीचे नाव 'ध्रुव विद्युत' आहे, जी इलेक्ट्रिक उत्पादनांवर संशोधन आणि निर्मिती करते. आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या सायकल उपकरणात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आनंद महिंद्रा आपले वचन पाळतात हे सर्वांना माहीत आहे. आता गुरसौरभचे हे उपकरण लोकांमध्ये किती लोकप्रिय होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल यासोबतच आनंद महिंद्रा गुरसौरभ यांच्या या उपकरणासाठी गुंतवणूक करतात की नाही हे विशेष बघण्यासारखे असेल.
Share your comments