हा सर्व संसार दररोज पैशांसाठी धावपळ करत असतो. आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी पैशांची गरज भासत असल्याने प्रत्येक जण आपल्या कामासाठी आपल्या जीवाची बाजी लावत असतो. अनेक जण मोठे अपार कष्ट करून देखील पैसे कमवण्यास असमर्थ ठरतात, अनेक जण पैसे तर कमावतात मात्र घरात नेहमी पैशांची चणचण भासत आल्याची तक्रार करतात. हिंदू सनातन धर्ममध्ये देवी लक्ष्मीस धनधान्याची व वैभवाची देवी म्हणून मान्यता मिळाली आहे, आपल्या घरात धनधान्याची नेहमीच भरभराट असो म्हणून अनेक लोक आई लक्ष्मीची मोठ्या भक्तीभावाने पूजा करत असतात. असे सांगितले जाते की ज्या व्यक्तीवर आई लक्ष्मीची विशेष कृपा असते त्या व्यक्तीच्या आयुष्यात पैशाची कधीच चणचण भासत नाही, अशा व्यक्तींचे आयुष्य सुख समृद्धीने आणि पैशाने गजबजलेले बघायला मिळते.
मात्र असे असले तरी, अनेक लोक सांगतात की, पैशांच्या प्राप्तीसाठी आणि घरात सुख शांती वैभव कायम राहावे म्हणुन देवी लक्ष्मीच्या आराधना समवेतचं ग्रहांचे शुभ रहाणे देखील अनिवार्य आहे. त्यामुळे आज आपण ग्रहांना शुभ स्थानी कसे विराजमान करायचे याविषयी महत्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. असे सांगितले जाते की, ज्या व्यक्तींना अपार धन प्राप्त करण्याची इच्छा असते त्या लोकांनी गुरुवारी एक विशेष उपाय केला पाहिजे कारण की, गुरुवार हा भगवान विष्णू देवाचा वार आहे, तसेच या दिवशी आई लक्ष्मी देखील विशेष प्रसन्न असते. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया धनप्राप्तीसाठी गुरुवारी कोणते उपाय करणे अनिवार्य राहणार आहे.
गुरुवारी करा हे उपाय, कधीच भासणार नाही पैशांची चणचण
»असे सांगितलं जातं की, गुरुवारी पिंपळाचे पान घरी आणावे त्यास स्वच्छ पाण्याने धुवावे. आता पानाला गंगाजल शिंपडून शुद्ध करून घ्यावे. त्यानंतर पानावर कुंकूने 'ओम श्रीं ह्रीं श्रीं नमः' लिहून कोरडे होऊ द्यावे. पान सुकल्यानंतर ते पिंपळाचे पान आपल्या पाकिटात ठेवावे. असे सांगितलं जातं की, हा उपाय केल्याने लक्ष्मी आणि भगवान विष्णू या दोघांची कृपा कायम राहते आणि ज्या पाकिटात हे पान असते अशा पाकिटात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही. परंतु पाकीट चामड्याचे नसावे अन्यथा या उपायाचा कुठलाचं लाभ मिळणार नाही.
»गुरुवारी बृहस्पतिला प्रसन्न करण्यासाठी दर गुरुवारी ‘ओम भगवते वासुदेवाय नमः’ या मंत्राचा जप करावा. तसेच गुरुवारी भगवान विष्णूला पिवळ्या रंगाची फळे अर्पण करावे आणि त्या फळाला प्रसाद म्हणून वाटावे, यामुळे घरात कधीच पैशाची चणचण भासणार नाही आणि घरात सदैव शांति आणि सुख समृद्धी नांदेल.
»गुरुवारी मंदिरात पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करणे देखील धन आणि ऐश्वर्य प्राप्तीसाठी खूप फलदायी असल्याचा दावा केला जातो.
»बृहस्पति ग्रहाला बलवान बनवण्यासाठी प्रत्येक गुरुवारी पूजा करताना हळदीचा टिळा आपल्या मनगटावर किंवा मानेवर लावावा, असे केल्याने कुंडलीत गुरु ग्रह मजबूत होण्यासोबतच व्यक्तीला प्रत्येक कार्यक्षेत्रात धनलाभ मिळत असतो, ज्यामुळे व्यक्तीला समाजात विशिष्ट मानसन्मान प्राप्त होतो.
»ज्या व्यक्तींना सतत पैशांची चणचण भासत असते, सदैव कसली ना कसली आर्थिक समस्या बनलेली असते. अशा व्यक्तीने प्रत्येक गुरुवारी जेवणात पिवळ्या वस्तूंचे सेवन करावे. तसेच अशा व्यक्तींनी क्षमतेनुसार मंदिरात केळी दान कराव्या, परंतु केळी खाऊ नये केळी फक्त दान करायच्या.
Share your comments