प्रधानमंत्री मुद्रा योजना ( पीएमएमवाय ) ही योजना ८ एप्रिल २०१५ रोजी मोदी सरकारने सुरू केली होती. नॉन - कॉरपोरेट, नॉन - फार्म लघू आणि सुक्ष्म उद्योजकांना या योजनेमार्फत १० लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. जर आपल्याला आपल्या व्यवसाय वाढवायचा असेल तर आपण या योजनेमार्फत कर्ज घेऊ शकतो. दरम्यान विविध बँक विविध योजना राबवून मुद्रा योजनेमार्फत कर्ज पुरवत आहेत. भारतातील सर्वात मोठी बँक एसबीआय ५९ मिनीटात १० हजार ते १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देते.
दरम्यान, ही योजनेची तीन प्रकार आहेत. शिशु लोन, किशोर लोन और तरुण मुद्रा या प्रकारातून ग्राहक कर्ज घेऊ शकतात. जर आपल्याला व्यवसाय सुरु करायाचा आहे किंवा स्टार्ट- अप उभारायचा असेल तर बँकेमार्फत ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते.
किशोर मुद्रा लोन - या योजनेमार्फत किशोर मुद्रा लोन या गटातून आपण ५० हजारापासून ते ५ लाख रुपयांपर्यंचे कर्ज घेऊ शकतात. यासाठी बँक १४ ते १७ टक्के पर्यंतचे व्याज आकारते. तरुण मुद्रा लोन - यातून आपण १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात. यासाठी बँक १६ टक्के व्याज आकरते.
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही मुद्रा लोन संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतात. https://www.mudra.org.in/ या संकेतस्थळावर जाणून आपण अर्ज करु शकतात. दरम्यान आपल्याला बँकेतून मुद्रा लो योजनेतून कर्ज मिळत नसेल तर टोल फ्री नंबरवर कॉल करुन तक्रार करु शकतात.
नॅशनल 1800 180 1111 आणि 1800 11 0001
महाराष्ट्र:18001022636
उत्तर प्रदेश: 18001027788
उत्तराखंड: 18001804167
बिहार: 18003456195
छत्तीसगढ़: 18002334358
हरियाणा: 18001802222
हिमाचल प्रदेश:18001802222
झारखंड: 1800 3456 576
राजस्थान: 18001806546
मध्य प्रदेश: 18002334035
मुद्रा लोनसाठी कोणते कागदपत्रे लागतात. ओळखपत्र, बँकचे स्टेटमेंट, फोटो, विक्रीचे कागदपत्र, प्राईस कोटेशन्स बिजनेस आयडी, आणि रहिवाशी दाखला,जीएसटी आइडेंटिफिकेशन नंबर, इनकम टॅक्स रिटर्नची माहितीही आपल्याला कागदपत्रासह द्यावी लागेल.
Share your comments