नवी मुंबई: भारतात अनेक नवयुवक आता व्यवसायाकडे वळू लागले आहेत. कोरोना महामारीपासून, यामध्ये मोठ्या झपाट्याने वाढ झाली आहे. बहुतेक लोकांनी आता लहान किंवा मोठे स्वतःचे स्टार्टअप सुरू केले आहे.
अनेक लोकांना कोरोना महामारी च्या काळात आपली नोकरी गमवावी लागली. यामुळे नाईलाजाने लोकांना उदरनिर्वाह भागवण्यासाठी व्यवसाय सुरू करावा लागला.
मात्र आता हा व्यवसाय अनेक नवयुवकांना फायद्याचा ठरत आहे. आता लाखों नवयुवकांच्या यशाने प्रेरित होऊन अन्य नवयुवक देखील व्यवसायाकडे वळू लागले आहेत.
अशा परिस्थितीत तुम्ही देखील नोकरीला कंटाळून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, परंतु तुमच्याकडे व्यवसायाची कल्पना नसेल, तर काळजी करण्यासारखे काही कारण नाही.
कारण की, आज आम्ही तुम्हाला अशाच एका बिझनेस आयडियाबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही दर महिन्याला चांगला नफा कमवू शकता.
कोणता आहे हा व्यवसाय?
आम्ही दुग्धजन्य पदार्थाच्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत, कारण हिवाळा असो किंवा उन्हाळा किंवा पावसाळा, प्रत्येक ऋतूमध्ये त्याची मागणी असते.
यामध्ये नगण्य नुकसान होण्याची शक्यता असते. लॉकडाऊनपासून दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी अनेक पटींनी वाढली आहे. हा असा व्यवसाय आहे ज्यामध्ये अपयशाची शक्यता जवळपास नाहीच.
शिवाय कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करून तुम्ही दरमहा भरपूर पैसे कमवू शकता. या व्यवसायादरम्यान, तुम्ही फ्लेवर्ड दूध, दही, बटर मिल्क आणि तूप बनवू शकता आणि विकू शकता.
सरकार देते एवढी मदत
या व्यवसायाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही सरकारचीही मदत घेऊ शकता. केंद्र सरकारच्या मुद्रा कर्ज योजनेतून तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देखील घेऊ शकता.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कर्ज घेण्यासोबतच सरकार तुम्हाला संपूर्ण प्रकल्पाची माहितीही देते. व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या सरकारी बँकेत मुद्रा योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करू शकता.
काही दिवसांनंतर, तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी कर्जाच्या स्वरूपात 70 टक्के पैसे मिळतील. त्यानंतर तुम्हाला तुमच्याकडून फक्त 30% रक्कम गुंतवावी लागेल.
Share your comments