1. इतर बातम्या

मानलं अर्जुना! भंगार उपयोगात आणून आठवीच्या विद्यार्थ्याने तयार केली नवी कोरी गाडी

भारतात अनेक प्रतिभावन युवक आहेत जे की आपल्या कार्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेत असतात. देशातील नवयुवकांमध्ये टॅलेंटची (Talent) अजिबात कमतरता नाही, आपल्या टॅलेंटचा वापर करीत देशातील नवयुवक आपल्या गरजाची पूर्तता करत असतात. असं सांगितलं जातं की, गरज ही शोधाची जननी (Need is the mother of invention) आहे अगदी याच पद्धतीने एका आठवीत शिकणाऱ्या कोवळ्या वयातील विद्यार्थ्याने आपल्या शोधाने सर्व्यांना आश्चर्यचा सुखद धक्का दिला आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
image credit - textshorthand

या हुन्नरी विद्यार्थ्याने आपल्या कौशल्याचा वापर करीत भंगारातील वस्तूंचा उपयोग करीत एक नवी कोरी इलेक्ट्रिक गाडी (Electric car) तयार केली आहे. ही गाडी इलेक्ट्रिक असल्याने या गाडीपासून प्रदूषण देखील होत नाही त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन होत असल्याचे सांगितले जात आहे. आठवीच्या विद्यार्थ्यांने तयार केलेली ही नवीकोरी गाडी मोठ्या चर्चेचा विषय ठरत असून या विद्यार्थ्याचे चहूकडून कौतुक केले जात आहे. सांगलीच्या विश्रामबाग येथील शाळेत शिकणाऱ्या अर्जुन खरात या आठवीच्या विद्यार्थ्यांने या गाडीची निर्मिती केली आहे. 

या विद्यार्थ्याने भंगारात असलेल्या लोखंडी ग्रील चा उपयोग करून गाडी साठी आवश्यक सांगाडा उभारला. सांगाडा उभारल्यानंतर या विद्यार्थ्याने मारुती कारचा स्टिअरिंग व्हील आणि सनी मोडेपचं इंजिन वापरले. चाकांसाठी त्याने लहान मुलांच्या सायकली ची चाके वापरून ही नवीकोरी इलेक्ट्रिक गाडी तयार केली. या गाडीसाठी या विद्यार्थ्यांनी 48 वॉटची डीपी मोटर उपयोगात आणले आहे. या गाडीमध्ये 12 वॉटच्या 4 बॅटरी देखील बसवण्यात आले आहेत. 

ही गाडी फुल चार्ज करण्यासाठी आठ तासांचा कालावधी लागतो आणि एकदा फुल चार्ज केल्यानंतर सुमारे 15 किलोमीटर धावते. या विद्यार्थ्याला ही गाडी तयार करण्यासाठी विश्रामबाग शैक्षणिक संस्थेचे अनमोल सहकार्य लाभले याशिवाय त्याच्या कुटुंबीयांनी देखील त्याला या कामात मोठी मदत केली. कलियुगी अर्जुनाचा हा नावीन्यपूर्ण प्रयोग परिसरात मोठा कौतुकाचा विषय ठरला आहे, त्याचा हा शोध इतर विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श ठरत असल्याचे सांगितले जात आहे.

English Summary: arjun invent an electric at the age of 14 year Published on: 10 March 2022, 10:13 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters