1. इतर बातम्या

पिक पेऱ्यांच्या नोंदणीसाठी अनिकेत धावला शेतकऱ्यांच्या बांधावर.

गोंडपिपरी :- शेतकऱ्यांना आता"ई-पिक पाहणी" अॕप्सच्या माध्यमातून पिक पेऱ्याची नोंदणी करावी लागणार आहे.मोबाईलच्या सहाय्याने ही नोंदणी होणार आहे.आधिच घरात अठरा विश्व दारिद्रय आणि अधूनमधून अस्मानी आणि सुलतानी संकटामूळे कायम परिस्थितीचे चटके सोसणाऱ्या हातात मोबाईल फोन नाही,आणि असलाच तर ग्रामीण भागांत "रेंज" नाही.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
पिक पेऱ्यांच्या नोंदणीसाठी अनिकेत धावला शेतकऱ्यांच्या बांधावर.

पिक पेऱ्यांच्या नोंदणीसाठी अनिकेत धावला शेतकऱ्यांच्या बांधावर.

"ई-पिक पाहणी" अॕप्सच्या माध्यमातून केली जाणारी नोंदणी बळीराज्यासाठी त्रासदायक ठरु लागली आहे.असे असतांना आता गोंडपिपरी तालुक्यात अनिकेत दुर्गे नावाचा युवक पुढे आला.आणि भंगाराम तळोधी परिसरात त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जात सहकार्य करण्याचे औदार्य दाखविले आहे.ऐवढेच नाही तर नोंदणी करतांना शेतकऱ्यांना कुठलीही अडचण आल्यास आपण सदैव तयार असून संपर्क साधण्याचे आव्हाहन तालुकावासियांना केले आहे.

उद्योगविरहीत गोंडपिपरी तालुक्याची मदार शेती अन शेतमजूरीवर आहे.अश्यातच कधी ओला दूष्काळ तर कधी अतीवृष्टी यामूळे शेतकरी आधीच वैतागून असतो.आता तर गत वर्षीपासून कोरोनामूळे जनसामान्यासह बळीराज्याचे जीवन मेटाकूटीला आले आहे.अश्यात आपल्या परिवाराचे पालन पोषन करायचे कसे ? हा यक्षप्रश्न सर्वासमोर ऊभा ठाकले.असे असतांना यंदाच्या या खरिप हंगामात कसाबसा उभा झाला.रोवणीही केली.निंदण खूरपण सुरु आहे.असे असतांना शासनाने"ई-पिक पाहणी" अॕप्सच्या माध्यमातून केली पिक पेऱ्याची नोंदणी करण्याच्या सूचना केल्या.ग्रामीण भागात अतीशय त्रासदायक असलेल्या या प्रक्रियेला विरोधही झाला.मात्र यासमोर शासनाच्या योजनेंपासून मुकावे लागणार असल्याच्या भितीने शेतकरीवर्ग मूकाट्याने त्रास झाला तरी चाचपडत

नोंदणी करतांना दिसून येत आहेत.अश्यावेळी शासनाकडून जाणिवजागृती गरजेची आहे.मात्र तसे होतांना दिसत नाही.अश्यातच तालुक्यातील मूळचा भंगारात तळोधी येथिल अनिकेत दुर्गे नावाचा युवक पुढे आला.शेतकऱ्यांच्या डोक्याला ताप असलेल्या सोबतच ज्या शेतकऱ्यांकडे स्मार्ट फोन नाही किंवा स्मार्ट फोन आहेत मात्र इ पिक नोंदणी करता येत नाही,अशा गोंडपिपरी तालुक्यातील शेतकऱ्यांना मोफत पिक पेऱ्हा नोंदणी करून देण्याचे काम १४ सप्टेंबरपासून सुरू केले आहे.या

संदर्भात त्यांनी समाजमाध्यमासून ही पोस्ट सर्वत्र पसरविली.याचा परिणाम म्हणून अनेक ठिकाणच्या युवा वर्गानी सुद्धा हे काम हाती घेतलं आहे.ऐकंदरीत आता पिक पेऱ्याची नोंदणी करतांना शेतकऱ्यांना कुठलीही अडचण आल्यास आपण सदैव तयार असून संपर्क साधण्याचे आव्हाहन अनिकेत दुर्गे यांनी तालुकावासियांना केले आहे.

 

अनिकेत दुर्गे यांची ओळख सर्वदूर आहे.उत्कृष्ठ वक्ता आणि समाजिक क्षेत्रात हिरारीने भाग घेणे आणि हाती घेतलेले काम तडीस नेणारा उमदा युवक म्हणून सुपरिचीत आहे.अश्यातच आता बळीराज्याच्या मदतीला धावून जात अनिकेतने आपल्या सामाजिक संवेदनेचा अनोखा परिचय दिला आहे.

 

प्रतिनिधी - गोपाल उगले

English Summary: Aniket ran to the farmers' bund to register the crop. Published on: 24 September 2021, 10:50 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters