1. इतर

ऐकलं का ! २५ दिवसानंतर येतील तुमच्या बँक खात्यामध्ये येतील २ हजार रुपये

KJ Staff
KJ Staff


केंद्र सरकारची सगळ्यात मोठी शेतकऱ्यांची योजना म्हणजे पीएम किसान योजना. या योजनेच्याद्वारे शेतीसाठी तुमच्या बँक अकाउंटमध्ये २० हजार रुपये पाठवण्याची तयारी सुरू आहे. पंतप्रधान शेतकरी किसान सन्मान निधी योजनेचा हा सातवा हप्ता १ डिसेंबर पासून यायला सुरू होईल. म्हणजेच २५ दिवसांनंतर केंद्र सरकार तुमच्या खात्यामध्ये २ हजार रुपये ट्रान्सफर करेल. या योजनेद्वारे एका वर्षात तीन हप्त्यांच्या  माध्यमातून  ६ हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना सहा हप्ते पाठविण्यात आले आहेत.

मागच्या २३ महिन्यांमध्ये केंद्र सरकारने ११.१७ कोटी शेतकऱ्यांना ९५ कोटी पेक्षा जास्त मदत केली आहे. या तीन हा त्यापैकी पहिला हप्ता १ डिसेंबर ते ३१ मार्चच्या मध्ये येतो. दुसरा हप्ता हा १ एप्रिल ते ३१ जुलैच्या दरम्यान आणि तिसरा हप्ता एक ऑगस्ट ते ३० नोव्हेंबरच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केला जातो. जर सगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट व्यवस्थित दिल्या असतील तर ११.१७ खोटी रजिस्टर शेतकऱ्यांच्या खात्यावर सातवा हप्ता ट्रान्सफर केला जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले स्वतःचे रेकॉर्ड व्यवस्थित चेक करून घ्यावे. कारण की, त्यामुळे तुम्हाला पैसे महिन्यांमध्ये समस्या यायला नको. कृषी मंत्रालयाच्या सूत्रानुसार, १.३ करोड शेतकऱ्यांनी अर्ज करून सुद्धा त्यांच्या खात्यात पैसे देऊ शकला नाही कारण त्यांच्या रेकॉर्डमध्ये काहीतरी चुकी आहे किंवा आधार कार्ड नाही किंवा नावाच्या स्पेलिंग मध्ये काहीतरी चुकी झाली आहे, त्यामुळे अशा शेतकऱ्यांचा येणारा पैसा हा थांबलाय.

तुमचे स्वतःचे रेकॉर्ड कसे चेक करावे?

या योजनेचे ऑफिशिअल वेबसाईट pmkisan.gov.in ही आहे. या वेबसाईटला लॉग इन करून यामध्ये दिलेल्या फार्मर कॉर्नर या त्यावर क्लिक करावे. जर तुम्ही अगोदर अर्ज दिला असेल आणि तुमचा आधार व्यवस्थित अपलोड झाले नसेल किंवा तुमचा आधार नंबर चुकीचा नोंद केली गेली असेल इत्यादी चुक्याची माहिती तुम्हाला मिळेल. फार्मर कॉर्नर या टॅबमध्ये या योजनेमध्ये रजिस्टर करण्यासाठी चा पर्याय दिलेला असतो. या टॅबमध्ये सरकारने लाभार्थ्यांची सगळी यादी अपलोड केलेली आहे. आपल्या अर्जाची स्टेटस, आधार क्रमांक, बँकेचा खाता क्रमांक इत्यादी द्वारे तुम्ही माहिती करू शकता.


मंत्रालयाशी संपर्क करण्याची सुविधा

 ही योजना मोदी सरकारची सगळ्यात मोठी शेतकरी योजना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात सवलती दिल्या गेल्या आहेत. त्याच्यातली एक म्हणजे हेल्पलाइन नंबर, त्याआधारे तुम्ही देशाच्या कुठल्याही कोपऱ्यातून थेट कृषी मंत्रालयाशी संपर्क करू शकतो.

 पीएम किसान टोल फ्री नंबर

18001155266

 पी एम किसान हेल्पलाइन नंबर

155261

 पीएम किसान लँडलाईन नंबर

011-23381092, 23382401

 पीएम किसानची नवीन हेल्पलाइन

011-24300606

 ई-मेल आयडी-pmkisan-ict@gov.in

 


नवीन शेतकऱ्यांनी कसे करावे रजिस्ट्रेशन?

 जर तुम्ही आतापर्यंत या योजनेमध्ये रजिस्ट्रेशन केले नसेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन करून या योजनेचा फायदा मिळू शकतात. वरती दिलेल्या वेबसाईटवर जाऊन यामध्ये तुम्हाला फार्मर कॉर्नरचा पर्याय दिसेल. यामध्ये न्यू फॉर्मर रजिस्ट्रेशन वर क्लिक करावे. त्यानंतर तुमच्या समोर एक विंडो ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला स्वतःचा आधार कार्ड नंबर, आधी सगळे विवरण विस्तृत भरावे लागेल. त्यानंतर हेअर टू कंटिन्यू वर क्लिक करावे. त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल. यामध्ये जर तुम्ही अगोदर रजिस्ट्रेशन केले असेल तर तुमची डिटेल्स दिसेल आणि जर रजिस्ट्रेशन नवीन करत असाल तर समोर दिसेल रेकॉर्ड नॉट फाऊंड विथ गिव्हेन डिटेल्स डू यु वॉन्ट टू रजिस्टर ओपन पीएम किसान पोर्टल(RECORD NOT FOUND WITH GIVEN DETAILS, DO YOU WANT TO REGISTER ON PM-KISAN PORTAL ) यावर क्लिक करून तुम्हाला yes करावे लागेल.

त्यानंतर तुम्हाला एक फॉर्म दिसेल तो फॉर्म भरावा. त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुमच्या जमिनीची संपुर्ण माहिती भरावी लागेल.  तुमचा खाते नंबर व्यवस्थित टाकावा. त्यानंतर सेव करावे. सेव्ह केल्यानंतर तुमच्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि रेफरन्स नंबर मिळेल, तो तुम्ही सांभाळून ठेवावा. त्यानंतर तुम्हाला पैसा येणे सुरू होऊन जाईल.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters