मित्रांनो कोरोना सारख्या महाभयंकर आजारामुळे अनेक लोकांचे रोजगार गेलेत आणि त्यामुळे बेरोजगारी अजूनच वाढली. त्यामुळे व्यवसाय करणे हि काळाची गरज बनत चालली आहे. व्यवसाय करण्यासाठी खुप मोठ्या प्रमाणात पैसा लागतो असा लोकांचा समज आहे पण मित्रांनो वास्तव बघता तस काही नाही आहे आपण केवळ थोडीशी इन्व्हेस्टमेंट करून देखील अनेक व्यवसाय करू शकतात.
आज कृषी जागरण आपल्या वाचक मित्रांसाठी 50,000 रुपयाच्या आत सुरु होणाऱ्या काही व्यवसायावीषयी माहिती घेऊन आले आहे. चला तर मग जाणुन घेऊया 50000 च्या आत सुरु होणारे व्यवसाय नेमके कोणकोणते आहेत.
ब्युटी पार्लर
मित्रांनो आजच्या ह्या फॅशन च्या युगात सजन सवरण कोणाला नाही आवडत! त्यामुळे हा व्यवसाय चालू करून आपण देखील चांगली कमाई करू शकतात. अलीकडे पुरुष आणि स्त्री ह्या दोघांसाठी म्हणजे unisexual beauty parlour ची संकल्पना खुपच गाजत आहे. त्यामुळे आपण देखील ह्या प्रकारे unisexual beauty parlour ची सुरवात करून चांगली कमाई करू शकता. ह्यासाठी आपण फक्त 50000 रुपये इन्व्हेस्टमेंट करून हा व्यवसाय करू शकतात. ह्या व्यवसायासाठी आपल्याला तीन ते सहा महिन्यापर्यंत ब्युटीसियन चा कोर्स करावा लागेल. कोर्स केल्यानंतर आपल्याला काही ब्युटी प्रॉडक्ट्स आणावे लागतील तसेच काही मशीनरी देखील विकत घ्याव्या लागतील.
. हा व्यवसाय आपण घरी सुद्धा सुरु करू शकता. घरी व्यवसाय सुरु करून हळूहळू हा व्यवसाय आपण वाढवू शकता. जर आपल्यालाही सजन सवरण आवडत असेल, छंद असेल तर आपण आपला छंद जोपासून हा व्यवसाय सुरु करू शकतात आणि चांगली कमाई देखील करू शकतात.
कस्टम गिफ्ट शॉप
आजकाल वाढदिवसाच्या निमित्ताने, लग्नाला गिफ्ट म्हणुन, लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक लोक आता कस्टम गिफ्ट देतात. त्यामुळे तुम्ही कस्टम गिफ्टची शॉपी चालू करून चांगली कमाई करू शकता.
लोक आता personalised gift देणे पसंद करतात. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी आपल्याला टीशर्ट, मग, मोबाईल कव्हर इत्यादी वर फोटो प्रिंट करण्यासाठी मशीनची आवश्यकता लागेल. मशीन ऑपरेट करणे सोपे आहे त्यामुळे हा व्यवसाय आपण अगदी सहजरीत्या सुरु करू शकता. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी आपल्याला 50000 रुपये पर्यंत खर्च येऊ शकतो.
Share your comments