आधार कार्डचे महत्व भारतात आपणांस सर्वांना ठाऊक आहे. आधार एक महत्वाचे दस्ताऐवज आहे ज्याचा वापर बँकिंग क्षेत्रात अनिवार्य आहे. आता बँकात आधार शिवाय काही पर्याय उरत नाही. आधार नसेल तर आपले बँक अकाउंट ओपन केले जाऊ शकत नाही. एवढेच नाही तर डिबीटी (Direct Benifit Transfer) सारख्या योजनेसाठी देखील आधार खुप महत्वाचे आहे. केवायसी साठी देखील आधार महत्वाचे आहे. पण आधार कार्डचा (Aadhar Card)वापर करून आपले बँक अकाउंट हॅक केले जाऊ शकते का? हा प्रश्न तुम्हालाही कधीना कधी पडलाच असेल चला तर मग जाणुन घेऊया ह्या प्रश्नाचे उत्तर.
UIDAI काय सांगते ह्यावर
अलीकडे बँक अकाउंट ला आधारकार्ड लिंक करणे अनिवार्य झाले आहे. त्यामुळे अनेक खातेधारक चिंता करतात की बँकाच्या त्यांच्या ठेवी सुरक्षित तर आहेत ना? आणि आपल्या आधारचा कोणी दुरुपयोग करून आपली रक्कम लंपास तर नाही ना करू शकत? ह्याविषयीं माहिती देताना आधार कार्ड जारी करणारी संस्था UIDAI सांगते की, केवळ आपला आधार क्रमांक माहित आहे म्हणुन कोणीही आपले बँक अकाउंट हॅक नाही करू शकत.
ह्याविषयीं अधिक माहिती देताना, UIDAI सांगते की, जसे तुमच्या एटीएम कार्डचा नंबर जाणून घेतल्याने एटीएम मशीनमधून पैसे काढता येत नाहीत. त्याचप्रमाणे कोणीही तुमचे बँक खाते आधार क्रमांक वापरून हॅक करू शकत नाही आणि म्हणुन फक्त तुमचा आधार क्रमांक वापरून कोणीही तुमच्या अकाउंट मधून पैसे काढू शकत नाही. पण तुम्ही बँकांनी दिलेला तुमचा पिन/ओटीपी कोणाशीही शेअर करायचा नाही. जर तुम्ही तुमचा एटीएम पिन, एटीएम कार्डचा सीवीवी कोडं, तसेच ऑनलाईन व्यवहार करताना आपल्या मोबाईल नंबर वर प्राप्त झालेला ओटीपी कोणाशी शेअर नाही केला तर तुमचे बँक खाते सुरक्षित राहील ते कोणीही हॅक करू शकत नाही.
UIDAI म्हणते की आतापर्यंत आधार कार्ड क्रमांक वापरून आर्थिक ठगी झाल्याचे एकही प्रकरण सामोरे आलेले नाही. केवळ आधार क्रमांक वापरून बँकिंग व्यवहार हा केला जात नाही त्यासाठी बायोमेट्रिक करावे लागते म्हणजे तुमच्या अंगठ्याच्या ठस्याशिवाय पैशाचा व्यवहार होत नाही. त्यामुळे केवळ आधार क्रमांक वापरून बँकिंग अकॉउंट हॅक केले जाऊ शकत नाही.
Share your comments