आधार कार्ड हे सध्याच्या काळात प्रत्येक कामासाठी जवळ जवळ लागते. बँक असो किंवा कुठलेही शासकीय काम यामध्ये अत्यावश्यक कागदपत्रांच्या यादीत आधार कार्डचा समावेश आहे.अगदी छोट्या छोट्या गोष्टी मध्ये आधार कार्ड लिंक करणे फार गरजेचे आहे.
बँक खाते असो किंवा तुमचे पीएफ खाते यांना आधार कार्ड लिंक करणे फार गरजेचे आहे.असे हे महत्त्वाचे दस्तावेज आहे.
एवढे महत्त्वाचे दस्तावेज असलेले आधार कार्डचा कोणी गैरवापर करत असेल तर ते साहजिकच त्रासदायक होऊ शकते. बऱ्याच लोकांना आपल्या आधार कार्ड बनावट आहे हे देखील माहित नसते. एखाद्या कामासाठी आपण आधार कार्डचा वापर करायला जातो तेव्हा ही गोष्ट लक्षात येते.
त्यामुळे ऐन वेळेला फसगत ही होते आणि नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे होणारा त्रास टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आधार कार्ड खरे आहे किंवा बनावट हे तपासून पाहू शकता.
युआयडीएआय अर्थात भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी कडून यासंदर्भात काही सूचना जारी करण्यात आल्याआहेत.यानुसार तुम्ही तुमच्या आधार कार्ड ची ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने पडताळणी करू शकतात. जर तुम्हाला आधार कार्ड चे ऑफलाइन पडताळणी करायचे असेल तर त्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करावा लागतो. जर तुम्हाला ऑनलाईन पडताळणी करायची असेल तर resident.uidai.gov.in/verify या लिंक वर क्लिक करावे लागते.या लिंक वर जाऊन तुम्ही तुमचाबारा अंकी आधार कार्ड क्रमांक टाकून आधारच्या खरे-खोटेपणा ची खात्री करू शकता.
आधार कार्डची पडताळणी करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.
- सर्वप्रथम gov.in/verify या लिंक वर लॉग इन करा.
- त्यानंतर एक पेज ओपन होते. या ओपन झालेल्या पेजवर तुम्हाला समोर टेक्स्टबॉक्स दिसते. या बॉक्समध्ये तुम्ही तुमचा बारा अंकी आधार क्रमांक नोंदवा.
- त्यानंतर असलेला कॅपच्या कोड टाका.
- त्यानंतर व्हेरिफाय बटनावर क्लिक करा.
- तुमचा आधार क्रमांक एक योग्य असल्याचा एक मॅसेज पेजवर डिस्प्ले होईल. त्यामध्ये नमूद केलेल्या आधार क्रमांकाचे पडताळणी करून घ्या.
- या शिवाय तुमचा खाजगी तपशीलही या पेजवर दिसतो.
Share your comments