1. इतर बातम्या

पोस्टाच्या या योजनेतून दरमहा मिळेल ५ हजार रुपये, जाणून घ्या काय प्रक्रिया

कठीण काळात नियमित उत्पन्नाची प्रत्येकालाच गरज आहे. याशिवाय सर्वांनाच आपल्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद करावयाची आहे. सुरक्षित गुंतवणूक आणि नियमित उत्पन्न हवे असल्यास पोस्ट ऑफिसची (Post Office) मंथली इन्कम स्कीम (MIS) हा तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. या योजनेमध्ये फक्त १,००० रुपयांची गुंतवणूक करता येते. याशिवाय तुम्हाला सिंगल आणि ज्वाईंट असे दोन्ही प्रकारचे खाते उघडण्याची सुविधा मिळते. या स्कीमद्वारे तुम्ही दर महिन्याला ५,००० रुपयांपर्यतचे उत्पन्न मिळवू शकता. कसे उघडायचे खाते आणि काय आहेत या स्कीमची वैशिष्ट्ये, जाणून घेऊया.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
पोस्ट ऑफिसची (Post Office) मंथली इन्कम स्कीम

पोस्ट ऑफिसची (Post Office) मंथली इन्कम स्कीम

सध्याच्या कठीण काळात नियमित उत्पन्नाची प्रत्येकालाच गरज आहे. याशिवाय सर्वांनाच आपल्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद करावयाची आहे. सुरक्षित गुंतवणूक आणि नियमित उत्पन्न हवे असल्यास पोस्ट ऑफिसची (Post Office) मंथली इन्कम स्कीम (MIS) हा तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो.

या योजनेमध्ये फक्त १,००० रुपयांची गुंतवणूक करता येते. याशिवाय तुम्हाला सिंगल आणि ज्वाईंट असे दोन्ही प्रकारचे खाते उघडण्याची सुविधा मिळते. या स्कीमद्वारे तुम्ही दर महिन्याला ५,००० रुपयांपर्यतचे उत्पन्न मिळवू शकता. कसे उघडायचे खाते आणि काय आहेत या स्कीमची वैशिष्ट्ये, जाणून घेऊया.
एकरकमी पैसे जमा करून मिळवा दरमहा उत्पन्न

पोस्ट ऑफिसच्या एमआयएसमध्ये तुम्ही एकरकमी पैसे जमा करून तुमच्यासाठी मंथली इन्कमची व्यवस्था करू शकता. या योजनेची खासियत अशी आहे की स्कीम मॅच्युअर्ड झाल्यानंतर तुम्हाला तुमचे सर्व पैसे परतदेखील मिळतील. पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम योजनेत गुंतवणूक करण्यासाठी फक्त १,००० रुपयांनी खाते उघडता येते. जर तुमचे खाते सिंगल आहे तर तुम्हाला जास्तीत जास्त ४.५ लाख रुपयांपर्यत पैसे जमा करता येतात. तर जर तुमचे ज्वाईंट खाते असेल तर जास्तीत जास्त ९ लाख रुपयांपर्यत रक्कम जमा करता येते.

मुलांच्या नावानेदेखील उघडा शकता खाते

पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम स्कीममध्ये तुम्ही मुलांच्या नावेदेखील खाते उघडू शकता. अर्थात यासाठी मुलाच्या आई-वडिलांना किंवा गार्डियनला या खात्यावर देखरेख करावी लागेल. मुलगा किंवा मुलगी १० वर्षांची झाल्यानंतर ते स्वत: हे खाते चालवू शकतात. या खात्याची पूर्ण जबाबदारी तो मुलगा किंवा मुलगी कायद्याने सज्ञान झाल्यानंतर मिळेल. पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम स्कीममध्ये खाते उघडण्यासाठी तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क करू शकता

 

पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम स्कीमशी संबंधित इतर मुद्दे

पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम खात्याच्या मॅच्युरिटीचा कालावधी ५ वर्षांचा असतो. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा कालावधी दर ५ वर्षांनी पुढे वाढवू शकता. जर तुम्हाला मॅच्युरिटीच्या आधीच पैसे काढायचे असतील तर यासाठी या योजनेत सुरू केलेले खाते किमान एक वर्ष जुने झालेले हवे. म्हणजेच खाते उघडल्यानंतर एक वर्षाने तुम्ही रक्कम काढू शकता. याच्या बदल्यात तुमच्या जमा झालेल्या रकमेतून २ टक्क्यांचे शुल्क घेतले जाईल. तर खाते सुरू झाल्यानंतर ३ वर्षांनी रक्कम काढल्यास १ टक्के शुल्क कापले जाईल.

 

दर महिन्याला कसे मिळतील ५ हजार

पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम स्कीम अंतर्गत तुम्हाला ६.६ टक्के व्याज दिले जाते. जर तुम्ही सिंगल खात्यामार्फत ४.५ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला सध्याच्या व्याजदरानुसार वार्षिक २९,७०० रुपये मिळतील. जर तुम्ही ज्वाईंट खाते उघडत ९ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला ५९,४०० रुपयांचे वार्षिक व्याज मिळेल. म्हणजेच दर महिन्याला तुम्हाला ४,९५० रुपयांचा परतावा मिळेल.

English Summary: You will get Rs. 5,000 per month from this post scheme, find out the process Published on: 08 May 2021, 05:18 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters