व्यवसाय करायचा म्हणजे मोठ्या गुंतवणुकीचा आणि मोठे भांडवल असलेला असावा असं काही नसतं.जर व्यवसाय मध्ये जिद्द,चिकाटी,अफाट मेहनत आणि उत्तम नियोजनाची सांगड घातली तर अनेक छोटे-छोटे व्यवसाय करून आर्थिक प्रगती साधता येते.असेच काही छोटे व्यवसाय विषयी लेखात आपण माहिती घेणार आहोत.
फळांचा ज्यूस, बेकरी शॉप,प्लंबर अँड इलेक्ट्रिशियन,मेस आणि टेलरिंग सारखे छोटे व्यवसाय आहेत,जय व्यवसाय आपण सहज रित्या करू शकतो. या लेखात आपण या व्यवसाय विषयी थोडक्यात माहिती घेऊ.
कमी भांडवलात करता येणारे व्यवसाय
- टेलरिंग- महिला आणि मुली नवीन फॅशन आणि डिझाईनच्या कपड्यांना पसंती देत असतात. लग्न किंवा इतर सामाजिक कार्यक्रमांना अनेकांना हटके करण्याची इच्छा असते.हे लक्षात घेऊन तुम्हाला टेलरचा व्यवसाय देखील करता येऊ शकतो. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी टेलर ची टीम आवश्यक असते.त्याद्वारे तुम्ही भरपूर प्रमाणात फायदा मिळू शकतात.जर तुम्ही ओएलएक्स, क्विकर आणि तर शॉपिंग वेबसाईट चा आधार घेतला तर ऑनलाईन पैसे कमवू शकतो.
- बेकरी शॉप- सध्या बदलत्या जीवनशैलीनुसार नागरिकांच्या सवयी बदलले आहेत. घरी पदार्थ बनवून खाणे एवजी बेकरी मधील पदार्थ खाण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. अलीकडील काळात बेकरीतील पदार्थांची मागणी वाढली आहे.तुम्हाला बेकरी व्यवसाय करायचा असेल तर स्वतः बेकरी सुरू करू शकता. तेव्हा एखाद्या नामांकित बेकरीचे फ्रॅंचाईजी घेऊ शकता.
- मेस- सध्याच्या काळामध्ये नोकरी किंवा कामाच्या निमित्ताने अनेक लोकांना घराच्या बाहेर राहावे लागते.त्यामुळे शहरात राहणाऱ्या लोकांची कमी किमतीत घरगुती जेवण मिळावे ही अपेक्षा असते. जर तुम्ही मेस सुरू केली आणि गुणवत्तापूर्ण जेवण दिले तर तुम्ही या व्यवसायात चांगला जम बसवून आर्थिक नफा मिळू शकतात. हा व्यवसाय सुरू केल्यानंतर माऊथ पब्लिसिटी होणे गरजेचे आहे.
- प्लंबर अँड इलेक्ट्रिशियन सेवा- प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन यासारखे सेवांची गाव किंवा शहर या ठिकाणी सतत गरज पडत असते.पाणी आणि वीज नसेल तर लोक हवालदिल होतात. यामुळे प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन यांचे टीम बनवून व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. हा व्यवसाय सुरू करून ग्राहकांना चांगल्या प्रकारची सेवा दिली तर रोजगाराच्या असंख्य संधी या क्षेत्रात निर्माण होऊ शकतात.त्यामुळे या व्यवसायात असता विचार केलेला अधिक चांगला.
- ज्यूस शॉप-कोरोना नंतर नागरिक आपल्या आरोग्याविषयी जागरूक झाले आहेत.नोकरी करणारे लोक जिमचा पर्याय देखील निवडतात.कामासाठी बाहेर पडणारे लोक विविध फळांचे ज्यूस पिणे आरोग्यदायी मानतात. लोक स्वतःहून ज्युसचे दुकान शोधत असतात. ज्यूस शॉप सुरू करण्यासाठी येणारा खर्च कमी असतो. ज्यूस शॉप सुरू करून आपण घरपोच सेवा दिली तर तुम्ही चांगले पैसे कमवू शकतात.
Share your comments