1. इतर बातम्या

ONLINE SELLING! तुमच्या शेतात पिकवलेले भाजीपाला आणि फळे विका ऑनलाइन कमवा मोठा नफा

सध्याच्या काळात आपला व्यवसाय असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. अशी इच्छा बाळगणाऱ्या साठी एक चांगली बातमी आहे. आताचे युग हे ऑनलाइन असल्याने प्रत्येक जण ऑनलाइन लागणाऱ्या वस्तू मागवत असतात. सरकार हे डिजिटल महारा साठी प्रोत्साहन देत आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
online shop

online shop

 सध्याच्या काळात आपला व्यवसाय असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. अशी इच्छा बाळगणाऱ्या साठी एक चांगली बातमी आहे. आताचे युग हे ऑनलाइन असल्याने प्रत्येक जण ऑनलाइन लागणाऱ्या वस्तू  मागवत असतात. सरकार हे डिजिटल महारा साठी प्रोत्साहन देत आहे.

 शेतकऱ्यांसाठी ही सरकारने ई पोर्टल सुरू करून शेतमाल डिजिटल पद्धतीने मार्केट पर्यंत पोहोचला आहे. जर तुम्हालाही व्यवसाय करायचा असेल तर एक भन्नाट आयडिया आहे. हो अगदी हा व्यवसाय ही ऑनलाईनच आहे.

 तुम्ही शेतीसह व्यवसाय करू शकता आणि मोठा नफा कमवू शकता. तुमच्या मळ्यात पिकलेल्या भाज्या आणि फळे तुम्ही ऑनलाइन आणि सहजगत्या विकून तुम्ही एका ऑनलाईन दुकानाचे मालक होऊ शकतात.शहरात किंवा निमशहरी भागातही ऑनलाईन खरेदीला लोक प्राधान्य देत आहे.

त्यामुळे आपल्या ऑनलाइन भाज्या विक्रीला नक्कीच पसंती मिळेल. आजच्या धकाधकीच्या जीवनामुळे लोकांकडे भाजी मंडईत जाण्यामुळे राहत नाही. यामुळे आपला ऑनलाईन भाजीपाला व्यवसाय त्यांच्यासाठी फार फायदेशीर ठरेल. अनेक मोठे मोठ्या कंपन्या या व्यवसायात उतरले आहेत. रिलायन्स, अमेझॉन आणि बिग बास्केट आधी कंपनी भाजीपाला आणि फळे विक्री व्यवसाय करत आहेत. छोट्या शहरातही या मोठ्या कंपन्या आपल्या शाखा सुरू करून व्यवसाय वाढवत आहेत.

 ऑनलाईन भाजीपाला व फळे विक्री व्यवसाय कसा सुरु करावा?

 आपल्या शेतात पिकलेला माल लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ऑनलाईन भाजीपाल्याचा व्यवसाय उत्तम पर्याय आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला एका वेबसाईट सुरु करावी लागेल.

त्याला काहीतरी नाव द्यावे लागेल. पुढे चालून हेच नाव तुमच्या व्यवसायाची ओळख होईल. त्यानंतर आपल्या वेबसाईट योग्य पद्धतीने सजवावी म्हणजेच  डिझाईन करावी. म्हणजे त्यातील मालाची वर्गवारी,मालाचा भाव एचडी ची व्यवस्थित मांडणी आपल्या वेबसाईटवर असू द्यावी. आकर्षक फोटो आपल्या वेबसाईटवर ठेवावे. सर्व सामान्य लोकांना समजेल अशा पद्धतीने आपली वेबसाईट तयार करा. यासह शर्ती  आणि अटी आपल्या वेबसाईटवर ठेवल्यानंतर घरपोच होणाऱ्या भाज्यांची किंमत सुनिश्चित करा.

English Summary: you can start bussiness of online selling of vegetable and fruit Published on: 10 October 2021, 01:40 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters