
pashusanvardhan suvidha vikaas nidhi
केंद्र शासनाने सुरू केलेल्या पशूसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी केली होती परंतु या योजनेचा पंधरा हजार कोटींचा निधी या वर्षी देण्यात आला आहे.
या योजनेच्या माध्यमातून दूध प्रक्रिया (आईस्क्रीम,चीज निर्मिती, मील्क पाश्चरायझेशन, दूध पावडर इत्यादी ), मास निर्मिती व प्रक्रिया पशुखाद्य,टी एम आर ब्लॉग्स,बायपास प्रोटिन, खनिज मिश्रण मुरघास निर्मिती तसेच पशु पक्षी खाद्य विश्लेषण प्रयोगशाळा या उद्योग व्यवसायांना 60 टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून या मधील व्याजदरात तीन टक्के सूट देण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ कसा घ्यावा?
- योजनेसंबंधी चा अर्जाचा नमुना आणि आवश्यक कागदपत्रांची यादी केंद्रशासनाच्या पशुपालन व डेअरी विभागाच्या https://dahd.nic.in/ahdfया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- या योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावरील पोर्टल द्वारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळावर https://ahd.maharashtra.gov.inलिंक देण्यात आली असून या योजनेच्या मार्गदर्शक सूचना मराठीत प्रसिद्ध करण्यातआले आहेत.
विविध उद्योग व्यवसाय यासोबतच लिंगविनिश्चितवीर्य निर्मिती,बाह्य फलन केंद्र,पशुधनाच्या शुद्ध वंशावळीच्याजातींचे संवर्धन या बाबींचा समावेश केला आहे.
या योजनेचा व्यक्तिगतव्यावसायिक शेतकरी उत्पादक संस्था खाजगी संस्था कलम 88 अंतर्गत स्थापन झालेल्या कंपनी यांना लाभ घेता येईल.या योजनेचा राज्यातील पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठीकेंद्र शासनाच्या पशुसंवर्धन पायाभूत विकास निधी उपयुक्त असून राज्यातील इच्छुक व्यावसायिक उद्योजक व संस्था या या योजनेचा लाभघेऊ शकता.
Share your comments