1. इतर बातम्या

तुम्हाला तुमच्या पेट्रोल बाईक मध्ये इलेक्ट्रिक किट बसायचे आहे का? तर एवढा येईल खर्च

सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत.त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला खूपच चटका बसत आहे. या पेट्रोल दरवाढीमुळे पेट्रोल वर चालणाऱ्या दुचाकी चालवणे एक डोकेदुखी होऊन बसलीआहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे हैराण असलेल्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
the bike

the bike

सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत.त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला खूपच चटका बसत आहे. या पेट्रोल दरवाढीमुळे पेट्रोल वर चालणाऱ्या दुचाकी चालवणे एक डोकेदुखी होऊन बसलीआहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे हैराण असलेल्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे.

तुम्हाला तुमच्या मोटरसायकलला किंवा स्कुटी ला इलेक्ट्रिक किट बसविता येणार आहे. त्यामुळे होणारा पेट्रोलच्या जास्त खर्चापासून  बचाव करता येणार आहे. शिवाय ही इलेक्ट्रिक किट बसवायचा खर्च देखील जास्त नाही. जर तुमच्याकडे हिरो स्प्लेंडर सारखी बाईक आणि स्कूटी मध्ये ॲक्टिवा सारखी स्कूटर असेल तर या वाहनांचे रूपांतर आता इलेक्ट्रिक बाइक मध्ये करता येणार आहे. त्यासाठी आपल्या देशामध्ये विविध प्रकारचे स्टार्टअप आहेत. यांच्या माध्यमातून आता इलेक्ट्रिक किट रिट्रोफिटिंग करण्याचे काम करता येणार आहे. यामध्ये  बाउन्स, GoGo1 आणि Zuink यासारखे कंपन्यांची नावे खूप प्रसिद्ध आहेत.

या कंपन्या बाईकचे इंजिन आणि गिअर बॉक्स  बदलतात आणि वाहनांना इलेक्ट्रिक मोटार बसवतात. तुम्ही गुगलवर देखील इलेक्ट्रिक मोटर किट असे सर्च केले तरी कमीत कमी किमतीच्या किट उपलब्ध होतात परंतु या अशा किट्सना सरकारची मान्यता नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मोटर वाहन कायद्याच्या कलम 52 नुसार वाहनांमध्ये नोंदणी व्यतिरिक्त कोणतेही रेट्रोफिटिंग बदल करायचा असल्यास आरटीओ मान्यताप्राप्त इलेक्ट्रिक किट घेणे योग्य राहते. पेट्रोल स्कूटरला इलेक्ट्रिक किट बसवण्यासाठी मोटरसायकल पेक्षा कमी खर्च येतो याचे कारण म्हणजे स्कूटरला  चांगली बुट स्पेस आहे. त्यामुळे कीट बसवण्याची किंमत कमी होते. आरटीओने मंजूर केलेल्या रेट्रोफिट इलेक्ट्रिक मोटर ची किंमत पंधरा ते वीस हजार रुपयांपर्यंत असते. परंतु श्रेणी आणि ऊर्जेच्या हिशोभा नुसार बॅटरी ची किंमत वेगळी द्यावी लागेल.

ही एक वेळेची किंमत असून एक बॅटरी तीन वर्षाच्या वारंटी सह मिळते काही कंपन्या स्वॅपकरणे योग्य बॅटरी भाड्याने देतात.Zuink किट स्वॅप करण्यायोग्य बॅटरी सहमिळते. ही कंपनी बेंगलोर मध्ये सेवा देते त्यांचे कीट 27 हजार रुपयांना मिळते. 899 रुपये प्रतिमहिना ई एम आय वर देखील हीकीट घेतली जाऊ शकते.GoGoA1 या बॅटरी ची किंमत पस्तीस हजार रुपये आहे. यामध्ये बॅटरी ची किंमत आणि जीएसटी वेगळा द्यावा लागणार आहे.हीकीट बाईकला लावल्या नंतर एका चार्ज नंतर दुचाकी 151 पर्यंत जाऊ शकते असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.(स्त्रोत-इंडिया दर्पण)

English Summary: you can retrofit electric kit in your petrol bike know electric kit price Published on: 31 January 2022, 06:54 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters