यासाठीच्या इशुची किंमत पाच हजार 91 रुपये प्रति ग्राम ठेवण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि डिजिटल पेमेंट करण्यासाठी तुम्हाला प्रति ग्राम पन्नास रुपये सुट मिळेल. याचा अर्थ तुम्हाला एक ग्रॅम सोन्यासाठी 5041 रुपये मोजावे लागतील.
सुवर्ण रोखे कोण जारी करते?
सार्वभौम गोल्ड बॉन्ड हा सरकारी बॉड आहे.जो रिझर्व बँक ऑफ इंडियाने जारी केला आहे.डिमॅट स्वरूपात रूपांतरित केले जाऊ शकते.त्याची किंमत सोन्याच्या वजनात आहे.
जर बॉण्डची किंमत पाच ग्रॅम सोन्याचे असेल तर रोख्याची किंमत पाच ग्रॅम सोन्याची किंमत एवढी असेल. खरेदीसाठी इशूची किंमत सेबीचा अधिकृत ब्रोकरला द्यावी लागेल..
हा बॉण्ड विकल्यानंतर गुंतवणूकदाराच्या खात्यात पैसे जमा होतात.सोव्हरेन गोल्ड बॉण्ड्स मध्येसोन्याच्या शुद्धतेबद्दल कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही.
नॅशनल स्टॉक एक्सचेंज नुसार गोल्ड बॉन्ड ची किंमत इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनद्वारे प्रकाशित 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या किमतीशी जोडलेली आहे.यासोबतच ते डिमॅट स्वरूपात ठेवता येते जे अगदी सुरक्षित आहे आणि त्यावर कोणताही खर्च नाही.
सोन्यात किती करता येते गुंतवणूक
एक व्यक्ती एका आर्थिक वर्षात किमान एक ग्रॅम आणि कमाल चार किलो मूल्य पर्यंतचे बॉण्ड खरेदी करू शकतो.तसेच ट्रस्ट साठी खरेदीची मर्यादा 20 किलो आहे.
तुम्ही बॉण्डमध्ये ऑफलाइन देखील करू शकता गुंतवणूक
रिझर्व बँक ऑफ इंडियाने त्यात गुंतवणूकीसाठी अनेक पर्याय दिले आहेत.यामध्ये बँक शाखा,पोस्ट ऑफिस,स्टॉक एक्सचेंज आणि स्टॉक होल्डिंग कॉपोरेशन ऑफ इंडियाद्वारे गुंतवणूक केली जाऊ शकते.
यासाठी ज्याला कुणाला गुंतवणूक करायची असेल त्यांना एक अर्ज भरावा लागतो. यानंतर तुमच्या खात्यातून पैसे कापले जातील आणि हे बॉण्ड तुमच्या डिमॅट खात्यात हस्तांतरित केले जातील.
यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य असून सर्व बँक,स्टॉक होल्डिंग कॉपोरेशन ऑफ इंडियालिमिटेड, मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज तसेच नॅशनल टॉक्स एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड मार्फतया बॉण्डची विक्री केली जाईल.
बॉण्डचा परिपक्वता कालावधी
याचा परिपक्वता कालावधी आठ वर्षाचा असतो.परंतु गुंतवणूकदारांना पाच वर्षानंतर यामधून बाहेर पडण्याची संधी मिळते.
तसेच जर आपल्याला पैसे काढायचे असतील तर तुम्ही ते पाच वर्षानंतर काढू शकता. जर तुम्हाला एखाद्या कर्ज घ्यायचे असेल तर कर्ज प्रक्रियेदरम्यान कॉलेटराल च्या रूपात तुम्हाला गोल्ड बॉन्ड चा उपयोग होऊ शकतो.
नक्की वाचा:'या' दिवशी येणार ई-श्रम कार्डधारकांच्या खात्यात पैसे, जाणून घ्या संपूर्ण तपशील
Share your comments