1. इतर बातम्या

इंटरनेट नाही, तुमचा मोबाईल लॉक झाला तरीसुद्धा तुम्ही करू शकतात पेमेंट,पेटीएम चे नवीन फिचर लॉन्च

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
paytm

paytm

भारतातील ग्राहक तसेच व्यापाऱ्यांसाठी आघाडीची डिजिटल पेमेंट ची सुविधा देणाऱ्या पेटीएमनेटॅप टू पे च्या लाँचची घोषणा केली आहे. या फिचर च्या माध्यमातून युजर्सना पीओएस मशीन व त्यांचा फोन टॅप करत पेटीएम रजिस्टर कार्डच्या माध्यमातून त्वरित पेमेंट करण्याची सुविधा आहे

तुमच्या मोबाईल फोन लॉककिंवा मोबाईल डेटा नसतानाही हे सेवा तुम्ही वापरू शकतात.  टॅप टू पे सेवा पेटीएम ऑल इन वन पीओएस डिव्हाइसेस, इतर बँकांच्या पीओएस मशीनच्या माध्यमातून अँड्रॉइड व आयओएस यूजर साठी उपलब्ध आहे.

 पेटीएम तंत्रज्ञानाचा वापर करून निवडलेल्या कार्ड च्या सोळा अंकी प्रायमरी अकाउंट नंबरला सुरक्षित व्यवहार कोड किंवा डिजिटल आयडेंटी फायर मध्ये रुपांतरीत करते.त्यामुळेकार्ड ची माहिती संबंधित यूजर पुरतीच मर्यादित राहते. थर्ड पार्टी पेमेंट प्रोसेसर सोबत शेअर केली जात नाही.

या माध्यमातून तुम्हाला रिटेल आउटलेट मध्येही पी ओ एस डिवाइस वर देयके भरता येतील. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला तुमच्या कार्डचीमाहिती शेअर करण्याची गरज नाही. पेटीएम ॲप वरील डेडिकेटेड डॅश बोर्डच्या माध्यमातून कार्डचे व्यवस्थापन करता येईल. यातून तुम्हाला तुमच्या व्यवहार हिस्ट्री ची देखील माहिती मिळते.

  या फीचर चा वापर कसा करता येईल?

  • प्रथम टॅप टू होम स्क्रीन वर ऍडन्यू कार्ड वर क्लिक करा.
  • किंवा लिस्ट मध्ये सेव केलेले कार्ड निवडा
  • संबंधित सगळे आवश्यक माहिती भरा.
  • त्यानंतर अटी आणि नियम एक्सेप्ट  करावे लागतील.
  • कार्ड सोबत नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी वर ओटीपी पाठवला जाईल.
  • त्यानंतर टॅपटु पे होम स्क्रीन वर ऍक्टिव्हेटेड केलेले कार्ड पाहता येईल.
English Summary: you can make payment without internet mobile lock by paytm app Published on: 13 January 2022, 04:59 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters