1. इतर बातम्या

एटीएम सारखे ठेवता येणार आता आधार कार्ड, पॉलीव्हीनिल क्लोराईड म्हणून मुद्रित केले जाणार आधार कार्ड

आधार कार्ड हे सगळ्यात महत्त्वाचे कागदपत्रांत पैकी एक कागदपत्र आहे. प्रत्येक शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी,बँकेत खाते उघडायचे असेल किंवा सिमकार्ड जऱी घ्यायचे असेल तरी आधार कार्ड आवश्यक आहे. आता युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात युआयडीएआय ने आधार कार्ड बाबत अधिकृत घोषणा केली आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
pvc adhaar card

pvc adhaar card

आधार कार्ड हे सगळ्यात महत्त्वाचे कागदपत्रांत पैकी एक कागदपत्र आहे.  प्रत्येक शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी,बँकेत खाते उघडायचे असेल किंवा सिमकार्ड जऱी घ्यायचे असेल तरी आधार कार्ड आवश्यक आहे. आता युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात युआयडीएआय ने आधार कार्ड बाबत अधिकृत घोषणा केली आहे.

आता नवीन आधार कार्ड पॉलीव्हीनील क्लोराईड अर्थात पीवीसी कार्ड म्हणून मुद्रित केले जाणार आहे.हे कार्ड एटीएम सारखे ठेवता येणार आहे.

 याबाबतीत यु आय डी ए आय एन ए मध्ये आहे की,नवीन आधार पीव्हीसी कार्डच असणार आहे. हे नवीन आधार कार्ड बऱ्याच अंशी एटीएम सारखे दिसेल. त्यामुळे पीवीसी कार्ड वर आधार कार्ड प्रिंट करता येणार आहे. तसेच हे कार्ड टिकाऊ असेल तसेच दिसण्यास ही आकर्षक असेल.गिलोच पॅटर्न,होलोग्राम, मायक्रोटेक्स अशा नव्या वैशिष्ट्यांचे हे कार्ड असणार आहे.

 या कार्डसाठी असा करा ऑनलाईन अर्ज

  • यासाठी सगळ्यात अगोदर युआयडीएआय च्या अधिकृत संकेतस्थळ https://uidai.gov.inवर ऑनलाईन अर्ज करावा.
  • या संकेतस्थळावर गेल्यानंतर होम पेजवर माय आधार वर क्लिक करावे.
  • तिथे गेल्यावर ऑर्डर बेस पीव्हीसी कार्डचा पर्याय निवडावा.
  • या नंतर बारा अंकी आधार क्रमांक किंवा सोळा अंकी  वर्च्युअल आयडी नमूद करावा लागतो.
  • त्यानंतर कॅपच्या कोड प्रविष्ट करावा  तसेच ओटीपी वर क्लिक करून तो मिळवणे आवश्यक आहे.
  • पुढच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एक ओटीपी प्राप्त होईल.तो ओटीपी सबमिट करावा.
  • त्यानंतर पीव्हीसी कार्डचे प्रीव्ह्यू समोर दिसेल.
  • यानंतर पेमेंट पर्यायावर क्लिक करा. या पेमेंट पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल.
  • ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यावर पीव्हीसी कार्डची नोंदणी होईल.
English Summary: you can make adhaar card like as atm card by online process Published on: 07 November 2021, 09:10 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters