भारतात आधार कार्ड (Aadhar Card) शिवाय कोणालाच पर्याय नाही. भारतातील जवळपास सर्व पात्र व्यक्तींकडे आधार कार्ड आहे. आधार हा ओळखीचा एक महत्वाचा पुरावा आहे. पण अशा ह्या महत्वाच्या कागदपत्रात अनेक लोकांना आपला रहिवाशी पत्ता (Address) चुकीचा मिळाला आहे शिवाय अनेक लोक आपल्या कामासाठी नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक होतात, त्यामुळे त्यांना आपल्या आधार वर पत्ता अपडेट करणे (Update Adress On Aadhar Card) महत्वाचे ठरते
पण अनेक लोक आधार केंद्रावर जावे लागेल म्हणुन पत्ता बदलू शकत नाहीत पण आता चिंता करू नका आम्ही आहोत ना! कृषी जागरण (Krishi Jagran) आमच्या वाचक मित्रांसाठी खास ही माहिती घेऊन आले आहे. आम्ही आज आपल्या आधार वर घरबसल्या ऑनलाईन पत्ता कसा बदलायचा (How To Change Address On Aadhar Card) ह्याविषयीं माहिती देणार आहोत. चला तर मग जाणुन घेऊया आधार वर पत्ता कसा बदलायचा ह्याविषयीं.
ऑनलाईन ह्या पद्धतीने बदला आपला आधारवरचा पत्ता (Change Your Aadhar Card's Address Online)
मित्रांनो भारतात जसजसे डिजिटलायजेशन होत आहे तसतसे लोकांना अनेक गोष्टी सोयीच्या होत चालल्या आहेत. आता आधार कार्डवर पत्ता बदलणे देखील खुपच सोपे झाले आहे. अवघ्या काही मिनिटात आपण घरबसल्या आता आधार वर आपला पत्ता/ऍड्रेस ऑनलाईन पद्धत्तीने अपडेट करू शकता.
आधार पत्ता अपडेट करण्याची प्रोसेस (Process Of Update Address On Aadhar Card)
»मित्रांनो जर आपणास आपल्या आधारवरचा पत्ता चेंज करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला UIDAI च्या https://ssup.uidai.gov.in/ssup/ ह्या ऑफिसिअल वेबसाईटला (Official Website) भेट द्यावी लागेल. वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्हाला लॉगिन (Login) करावे लागेल.
»त्यानंतर प्रोसीड टू अपडेट आधार (Proceed To Update Aadhar) ह्या पर्यायावर जा.
»आता तुमचा 12 अंकी आधार क्रमांक (Aadhar Number) प्रविष्ट करा
»
त्यानंतर कॅपचा कोडं (Captcha) प्रविष्ट करा
»ह्यानंतर तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकवर (Mobile Number) एक ओटीपी (One Time Password) प्राप्त होईल, तो ओटीपी तुम्हाला दिलेल्या रकान्यात भरावा लागेल, आणि त्यानंतर लॉगिन कराव लागेल
»तुम्हाला आता आपल्या आधारच्या डिटेल्स दिसतील. तिथे तुम्हाला एक ऍड्रेस प्रूफ सिलेक्ट करावा लागेल आणि फॉर्म सबमिट करावा लागेल.
Share your comments