भारतात 28 जानेवारी 2009 रोजी एक अभूतपूर्व गोष्ट घडली, ती गोष्ट म्हणजे आधार कार्डची (Aadhar Card) सुरवात ह्याच दिवशी झाली. आज माणसाकडे इतर कुठलेही दस्ताऐवज (Document) नसले तरी काही हरकत नाही, मात्र आधार असायलाच हवे. भारतात (India) आधार हे एक प्रमुख ओळखपत्र (ID Card) आहे. आधार हा भारतातील प्रत्येक नागरिकांचा (Citizen) सर्वात महत्वाचा दस्ताऐवज, पण ह्या अशा महत्वपूर्ण डॉक्युमेंट मध्ये असलेले आपले छायाचित्र (Photo) कोणाला उत्सुकतेने आपण दाखवत नाही;
कारण त्यावरील फोटो हा प्रत्येक व्यक्तीचा जवळपास विद्रुपच आला आहे. त्यामुळेच आधारच्या फोटो वरून इंटरनेट (Internet) वर असंख्य मेमे ट्रेंड करतात. आणि काही वेळेस झेरॉक्स करताना आधारवरचा फोटो हा स्पष्ट दिसत नाही खुपच अंधुक दिसतो, त्यामुळे अनेकांना समस्यांना सामोरे जावे लागते. जर आपणही आपल्या आधारकार्डच्या फोटोमुळे नाखुष असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी कारण आम्ही आज आपणांस आपल्या आधार वरचा फोटो कसा बदलू शकता ह्याविषयीं माहिती देणार आहोत. आपण आता अगदी काही सेकंदात आपला आधारचा फोटो बदलू शकतात. चला तर मग जाणुन घ्या आपल्या आधार कार्डचा फोटो बदलण्याची प्रोसस…
आधारवरचा फोटो बदलण्याची प्रोसेस…
आधार कार्डवरचा फोटो चांगला न आल्याने बहुसंख्य लोक नाराज आहेत त्यात तुम्हीही आहात हे आम्हाला माहितीय. पण चिंता की कोई बात नहीं? त्यामुळे आता तुम्हाला काळजी करण्याची काहीही गरज नाही. तुम्ही या सोप्या पद्धतीने तुमच्या आधार कार्डवरील फोटो अवघ्या काही सेकंदात बदलू शकता.
आधार कार्डशी संबंधित ही प्रोसेस खुपच सोपी आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची गरज भासणार नाही. यासाठी तुम्ही आपल्या जवळच्या आधार नावनोंदणी केंद्राला (Aadhar Enrolment Center) भेट देऊन तुमचा फोटो बदलू शकता. यासाठी आधी तुम्ही तुमच्या आधार कार्डासह आपल्या जवळच्या आधार नोंदणी केंद्रात जा. त्यानंतर तुम्ही त्यासाठी एक निर्धारित शुल्क आहे ती जमा करा.
या संपूर्ण प्रक्रियेसाठी, तुम्हाला एक फॉर्म देखील भरावा लागेल जो UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर (Official Website) सहज उपलब्ध होईल, जे आधार स्वतः जारी करते. आता जे विभागीय कर्मचारी असतील तिथे तुमचा फोटो क्लिक करतील. आता तुमचे हे नवीन छायाचित्र आधार कार्डावर काही सेकंदात टाकले जाईल.
Share your comments