भारतात आताच्या डिजिटल युगात आधार कार्ड (Aadhar Card) सर्वात महत्वाची भूमिका बजावत आहे. आपल्याला कुठल्याही सरकारी कामात (Government Work) आधारची गरज भासते. भारतात (India) भारतीय नागरिकांसाठी (Indian Citizen) आधार एक सर्वात मोठा दस्ताऐवज (Document) आहे आणि कुठल्याही सरकारी किंवा निम्नसरकारी कामात ओळखीचा तसेच पत्त्याचा पुरावा म्हणुन उपयोगी आहे. परंतु ह्या महत्वाच्या डॉक्युमेण्टवर काही त्रुटी देखील झाल्या आहेत जसे की काही लोकांच्या आधारकार्डवर नावाची गफलत झाली आहे, किंवा स्पेल्लिंग मिस्टेक झाली आहे तर काही लोकांच्या जन्मतारखा चुकीच्या प्रविष्ट केल्या गेल्या आहेत.
जर तुमच्याही आधार कार्डवरती अशा चुका झाल्या असतील तर काळजी करण्याचे काही कारण नाही. आज आम्ही आपणांस आपल्या आधार वरील ह्या चुका कशा दुरुस्त करायच्या किंवा आपल्या आधार कार्डवर नाव आणि जन्मतारीख कशी बदलायची ह्या विषयी माहिती सांगणार आहोत. मित्रांनो आपण आपल्या आधार कार्डवरील नाव, जन्मतारीख घरबसल्या बदलू शकता अगदी सहजरीत्या ते पण आपल्या मोबाईलद्वारे. चला तर मग वेळ न दवडता जाणुन घेऊया ह्याविषयीं संपुर्ण माहिती.
UIDAI (Unique Identification Authority of India) नुसार, जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरील तपशील दुरुस्त करायचा असेल किंवा बदलायचा असेल तर तुम्हाला ssup.uidai.gov.in/ssup/ ह्या वेबसाईटवर लॉग इन करावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल. मग तुम्हाला जी सेवा घ्यायची आहे, ती तुम्हाला निवडावी लागेल आणि त्यानुसार, तुम्हाला हवी असणारी कागदपत्रे ह्या साईटवर अपलोड करावी लागतील, कागदपत्रे ही स्कॅन करून अपलोड करावी लागतात.
यासाठी तुम्हाला नाममात्र सेवा शुल्क देखील भरावी लागेल, ही सेवाशुल्क किंवा फी तुम्ही इंटरनेट बँकिंगद्वारे (Internet Banking) भरू शकता.
जर तुम्ही तुमच्या आधारमध्ये प्रविष्ट केलेले नाव (Name On Aadhar Card) आणि जन्मतारीख (Date Of Birth) बदलणार असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या आधारशी जोडलेला म्हणजेच लिंक असलेला मोबाईल नंबर (Mobile Number) तुमच्याकडे असायला हवा, कारण सत्यापनासाठी म्हणजेच वेरिफिकेशनसाठी आधारकार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबरवर एक ओटीपी (One Time Password) येतो जो की आपल्याला त्या वेबसाईटवर नमूद करावा लागतो.
दुसऱ्यांदा आधार कार्डवरील नाव अथवा जन्मतारीख बदलायला आधार केंद्रात जावे लागेल
मित्रांनो येथे एक गोष्ट लक्षात घ्या की, आधार मध्ये जन्मतारीख ऑनलाईन (Online) म्हणजे मोबाईलद्वारे फक्त एकदाच बदलता येते जी की तुम्ही स्वतः बदलू शकतात. परंतु जर तुम्हाला ती माहिती म्हणजेच नाव आणि जन्मतारीख काही कारणास्तव पुन्हा अपडेट म्हणजेच बदल करायची असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार केंद्रात जावे लागेल. तेथे तुम्हाला जन्मतारखेशी संबंधित पुराव्याची कागदपत्रे आणि तुम्हाला स्वत: ची जन्मतारीख दुरुस्त करायची आहे असे स्वयं-घोषना केलेले फॉर्म (Self Declaration Form) द्यावा लागेल तेव्हा तुमचे आधार वरील माहिती अपडेट होईल.
Share your comments