देशात सर्वत्र पेट्रोल डिझेलचे भाव गगनभरारी घेत आहेत. पेट्रोल डिझेलचे दर आकाशाला गवसणी घालत असल्यामुळे देशात सर्वत्र इलेक्ट्रिक बाईक ची मागणी वाढली आहे. देशातील नामीगिरामी मोटर बाईक निर्मात्या कंपन्या इलेक्ट्रिक बाईक लॉन्च करीत आहेत. देशातील अनेक नामांकित आणि बड्या कंपन्या इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करीत आहेत. देशात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी वाढली असल्याने, एलेक्ट्रिक मोबिलिटी ब्रँड AMO ने देखील इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे.
AMO ने या इलेक्ट्रिक स्कूटरला Jaunty Plus असे नाव दिले आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये सर्व अद्ययावत फीचर्स देण्यात आले आहेत. आपल्या या वैशिष्ट्यांमुळेच ही स्कूटर अल्प कालावधीतच लोकांची पहिली पसंत बनू शकते असे सांगितले जात आहे. या स्कूटरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या स्कूटरची डिझाईन खूपच उत्तम आहे, डिझाईन सोबतच ही स्कूटर सुरक्षेसाठी देखील उत्तम असल्याचे सांगितले जाते. शिवाय या स्कूटरची कार्यक्षमता इतर बड्या कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटर सारखीच असल्याचे सांगितले जात आहे. AMO इलेक्ट्रिक बाईक्सने देशातील मध्यमवर्गीयांचा विचार केला आहे. ही स्कूटर स्वस्तात तसेच उत्तम मायलेज देण्यासाठी सक्षम असल्याने मध्यमवर्गीयांची पहिली पसंत बनू शकते असे तज्ञांनी मत व्यक्त केले आहे. मित्रांनो चला मग या इलेक्ट्रिक स्कूटरचे काही निवडक वैशिष्ट्ये जाणून घेऊया.
Amo इलेक्ट्रिक बाइकने Jaunty Plus ची एक्स शोरूम प्राईस 1 लाख 10 हजार 460 रुपये एवढी ठेवली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर वर कंपनीने तीन वर्षांची वॉरंटी देखील प्रदान केली आहे. तसेच ग्राहकांचा विचार करून या स्कूटरला पाच कलर मध्ये उपलब्ध करून दिले गेले आहे. लाल-काळा, राखाडी-काळा, निळा-काळा, पांढरा-काळा आणि पिवळा-काळा या कलर मध्ये जॉनटी प्लस ही स्कूटर मार्केटमध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच कंपनीने ग्राहकांना आपल्या आवडीचे कलर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. जॉनटी प्लस चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही स्कूटर एकदा फुल चार्ज केल्यास सुमारे 120 किलोमीटर पर्यंत धावण्यास सक्षम आहे. एकंदरीत ही गाडी मायलेजचा बाप म्हणून ओळखली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या स्कूटरला फुल चार्ज होण्यासाठी अवघा चार तासांचा काळ लागतो. या बाईक मध्ये सर्व अद्ययावत फीचर्सला लोड करण्यात आले आहे.
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये उच्च-कार्यक्षमतेची मोटर लावण्यात आली आहे. तसेच इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये क्रूझ कंट्रोल स्विच देखील देण्यात आले आहे यामुळे रायडरला सुखद अनुभव मिळणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. याशिवाय या एलेक्ट्रोनिक स्कूटरला इलेक्ट्रॉनिक असिस्टेड ब्रेकिंग सिस्टम अर्थात EABS ही अद्ययावत ब्रेकिंग सिस्टम देण्यात आली आहे. तसेच या स्कूटरचे अजून एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या स्कूटरमध्ये चोरीविरोधी अलार्म अर्थात अँटी थेफ्ट अलर्म सारखी अद्ययावत सुविधा देखील प्रदान करण्यात आली आहे. तसेच या एलेक्ट्रिक स्कूटर मध्ये टेलिस्कोपिक फोर्क सस्पेंशन, हाय ग्राउंड क्लीयरन्स, साइड स्टँड सेन्सर्स, सेंट्रल लॉकिंग, फ्रंट डिस्क ब्रेक, डीआरएल लाईट्स आणि इंजिन किल स्विच यांसारख्या सर्व अद्ययावत फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. आपल्या फिचर्समुळे आणि दमदार मायलेज मुळेही बाईक लवकरच ग्राहकांच्या पसंतीस उतरेल असा कंपनीचा दावा आहे.
Share your comments