जर आपल्याला व्यवसाय करायचा असेल किंवा नौकरीतुन मिळणाऱ्या मानधन मधून आपल्या परिवाराचा फक्त उदरनिर्वाहच भागत असेल आणि यासाठी आपणांस काही तरी साईडने इनकम आली पाहिजे असे वाटतं असेल तर आपल्यासाठी आम्ही आज एका भन्नाट व्यवसायाची कल्पना घेऊन आलो आहोत. आम्ही ज्या व्यवसायाबद्दल आज आपणास अवगत करणार आहोत तो व्यवसाय आहे वूडन फर्निचर बिझनेस. आपण हा बिजनेस सुरू करून चांगली मोठी कमाई करू शकता. जर आपल्याकडे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी पर्याप्त भांडवल उपलब्ध नसेल तर काळजी करू नका या बिझनेस साठी मोदी सरकार आपणास लोन देखील उपलब्ध करून देते. ह्या लोनचा उपयोग करून आपण सहजरीत्या हा व्यवसाय सुरू करू शकता.
अलीकडे वूडन फर्निचर ची मागणी ही लक्षणीय वाढली आहे त्यामुळे या बिजनेस मधून चांगली मोठी कमाई करण्याचा एक गोल्डन चान्स तयार झाला आहे.आम्ही आपणास सांगू इच्छितो की अलीकडे लोक आपल्या घराच्या सजावटीसाठी वूडेन फर्निचर चा वापर जास्त करतात. त्यामुळे हा व्यवसाय एक फायद्याचा सौदा सिद्ध होऊ शकतो. या व्यवसायासाठी आपण केंद्र सरकारच्या पंतप्रधान मुद्रा योजनेचा फायदा उचलू शकता, या योजनेचा उपयोग करून आपण सहज लोन प्राप्त करू शकता आणि हा व्यवसाय सुरु करू शकता. या योजनेद्वारे आपणास 80 टक्के लोन हे मंजूर होऊ शकते. हा बिझनेस कोणीही करू शकतो यासाठी विशेष अशी कॉलिफिकेशन ची आवश्यकता देखील नाहीय. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपणास सुरुवातीला तीन लाख पर्यंत भांडवल उभे करावे लागेल.
किती करावी लागणार इन्व्हेस्टमेंट
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याकडे कमीत कमी दोन लाख रुपये असायला हवेत. पंतप्रधान मुद्रा योजनेद्वारे आपणास हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जवळपास साडे सात लाख रुपये लोन मिळून जाईल. या पैशात आपण चार लाख रुपये फिक्स कॅपिटल म्हणून उपयोगात आणू शकता तसेच वर्किंग कॅपिटल म्हणून साडेपाच लाख रुपये उपयोगात आणू शकतात.
किती राहणार नफा
हा व्यवसाय सुरू करताच आपणास यातून कमाई मिळायला सुरुवात होईल. सर्व खर्च वजा जाता आपणास या व्यवसायातून महिन्याकाठी 60 हजार ते 1 लाख या दरम्यान निव्वळ प्रॉफिट राहू शकतो. आम्ही सांगितलेली रक्कम हा फक्त आमचा अंदाज आहे यात थोड्याफार प्रमाणात कमी जास्त होऊ शकते.
Share your comments