1. इतर बातम्या

काय सांगता! सोन्या-चांदीपेक्षा महाग आहे 'हे' लाकूड; किंमत ऐकाल तर व्हाल चकीत

आपण महागड्या वस्तूंची चर्चा केली तर लगेच जिभेवर हिरे, सोने, चांदी यांसारख्या वस्तूंची नावे येतात. मात्र अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या सोन्या चांदीपेक्षा महागड्या आहेत. आज आपण अशाच एका लाकडाविषयी माहिती जाणून घेणार आहोत, ज्याची किंमत थक्क करणारी आहे.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम

आपण महागड्या वस्तूंची चर्चा केली तर लगेच जिभेवर हिरे, सोने, चांदी यांसारख्या वस्तूंची नावे येतात. मात्र अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या सोन्या चांदीपेक्षा (gold and silver) महागड्या आहेत. आज आपण अशाच एका लाकडाविषयी माहिती जाणून घेणार आहोत, ज्याची किंमत थक्क करणारी आहे.

अगरवुड हे जगातील सर्वात महाग लाकूड आहे, याचबरोबर हे लाकूड सर्वात कमी देखील उपलब्ध होते. ऊं लाकडापासून तयार केल्या जाणाऱ्या सोन्याचे तेल म्हणतात. हे ऍक्विलेरियाच्या झाडापासून आगरवुड लाकूड येते. याला अ‍ॅलोवूड किंवा ईगलवुड असेही म्हणतात.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी खुशखबर; सोयाबीन पिकासाठी तब्बल ४० कोटी ७१ लाख रुपयांचा निधी मंजूर

जगभरात हे लाकूड (Wood) जपान, अरेबिया, चीन, भारत आणि आग्नेय आशियाई देशांमध्ये आढळते. अगरवुड हे जगातील सर्वात महागड्या लाकडांपैकी एक आहे. त्याची किंमत ३ लाख रुपये प्रति किलो पर्यंत आहे. एक प्रकारे पाहिले तर त्याची किंमत हिऱ्यापेक्षा जास्त आहे.

देशी बटाट्याची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर; 'या' पद्धतीचा वापर केल्यास मिळणार दुप्पट उत्पन्न

अगरवुडचा वापर अत्तर आणि औषधी मद्य बनवण्यासाठी केला जातो. आगरवुड (Agarwood Farming) लाकूड दीर्घ प्रक्रियेनंतर एक्वारियाच्या झाडापासून मिळवले जाते आणि ते कुजल्यानंतर ते डिंक किंवा ऑड तेल देते जे अत्तर बनवण्यासाठी वापरले जाते.

या तेलाची किंमत 25 लाख रुपये प्रति किलो आहे. भारतातील उत्पादनाबद्दल बोलायचे तर, आसाम हे त्याचे सर्वात मोठे उत्पादक आहे. वास्तविक आसामला अगरवुडची राजधानी म्हटले जाते.

महत्वाच्या बातम्या 
शेतकऱ्यांनो 'या' चारा पिकांचा बनवा मुरघास; दूध उत्पादनात होणार वाढ
भारताकडून तांदूळ निर्यातीवर बंदी; तांदळाच्या किमतीत 10% टक्क्यांनी वाढ
सावधान! पुढच्या 24 तासात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

English Summary: wood more precious than gold and silver shocked hear price Published on: 23 October 2022, 03:22 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters