1. इतर बातम्या

सौर पॅनेल्समधून दरमहा लाखो रुपये कमावण्याची संधी ; सरकारच्या या योजनेचा मिळेल फायदा

कोरोना काळात अनेकांना आपला रोजागार गमवावा लागला. अशा लोकांसाठी पीएम कुसुम योजना कमाईचा उत्तम पर्याय ठरू शकतो. यामध्ये तुम्ही सौर पॅनेल बसवून दरमहा लाखोंची कमाई करू शकता. चांगली गोष्ट म्हणजे या योजनेंतर्गत सरकार तुम्हाला सौर पॅनेल्स बसविण्यास मोठी सूट देखील देत आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
पीएम कुसुम योजना

पीएम कुसुम योजना

अशा लोकांसाठी पीएम कुसुम योजना कमाईचा उत्तम पर्याय ठरू शकतो. यामध्ये तुम्ही सौर पॅनेल बसवून दरमहा लाखोंची कमाई करू शकता. चांगली गोष्ट म्हणजे या योजनेंतर्गत सरकार तुम्हाला सौर पॅनेल्स बसविण्यास मोठी सूट देखील देत आहे.

कुसुम योजनेद्वारे आपण घराच्या छतावर किंवा रिकाम्या जागेवर सौर पॅनेल बसवून वीजनिर्मिती करू शकता. हे स्वतःसाठी वापरण्याशिवाय आपण ते विकू देखील शकता. हे आपले उत्पन्न दुप्पट करेल. वीज विकून पैसा देणारे योजना आहे तरी काय? याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.

हेही : जुनी 20 रुपयांची नोट तुम्हाला मिळवून देऊ शकते 3 लाख रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकार

सौर पॅनेल योजनेचा उद्देश

शेतकरी आणि आर्थिक दुर्बल घटकांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवून सरकार पंतप्रधान कुसुम योजना चालवित आहे. या योजनेत शेतकरी आपली शेतजमीन खासगी कंपन्यांना भाड्याने देऊन किंवा सौर पॅनेल बसवून आणि त्यातून मिळणारी वीज विकून नफा मिळवू शकतात. जर कुणी आपली जमीन भाड्याने दिली तर त्या बदल्यात त्याला चार लाखांपर्यंत भाडे मिळेल, यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतील.

 

योजनेचे फायदे

  • योजनेंतर्गत एखादी व्यक्ती सौर पॅनेल बसविण्यासाठी आपल्या जमिनीचा एक तृतीयांश भाग भाड्याने देऊ शकते. त्या बदल्यात कंपन्या त्यांना एकरी एक लाख रुपये दराने भाडे देतील. सामान्यत: हे भाडे 1 ते 4 लाखांपर्यंत असू शकते.

  • योजनेचा लाभ घेण्यासाठी कंपनी आणि अर्जदार यांच्यात सौर पॅनेल्स बसविण्याबाबत आणि भाड्याने देण्यासाठी करार केला जाईल. करार सहसा 25 वर्षे केला जातो. कराराचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर भाडे वाढेल.

  • सौर पॅनेल्स बसविण्यावरील संपूर्ण खर्च खासगी कंपनी उचलेल, यासाठी त्या व्यक्तीला कोणतेही पैसे खर्च करावे लागणार नाहीत. त्याचबरोबर वैयक्तिक वापरासाठी सौर पॅनेल बसविण्यावर सरकार कडक सूट देते.

  • एक एकर जमीन दिल्यास शेतकर्‍यांना 1000 युनिट मोफत वीज मिळेल. तसेच आवश्यकतेपेक्षा जास्त वीज निर्मिती झाल्यास ते ती कंपनीला किंवा सरकारलाही विकू शकतात.

 

वीज विकून पैसे कसे कमवायचे?

सोलर पॅनेल भाड्याने देण्याशिवाय अर्जदार वीज विक्री करून पैसेही कमवू शकतात. कुसुम योजनेसाठी नोंदणी करा आणि वीज विक्रीसाठी खासगी आणि सरकारी कंपन्यांशी संपर्क साधा. एक मेगावॅट सौर प्रकल्प उभारण्यासाठी सहा एकर जागेची आवश्यकता आहे. याद्वारे 13 लाख युनिट वीज मिळू शकेल.

English Summary: With the opportunity to earn lakhs of rupees per month from solar panels, the government will benefit from this scheme 23 Published on: 23 July 2021, 02:20 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters