मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत यांची ईडीकडून अनेकवेळा चौकशी झाली आहे. त्यानंतर आता ईडीचे पथक संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी दाखल झाले आहे. त्यामुळे संजय राऊत यांना अटक होणार का? असा प्रश्न सर्वांना पडत आहे. संजय राऊत यांच्या घराची झडती ईडीच्या (ED) टीमकडून करण्यात येत आहे. तसेच राऊत यांच्या कुटुंबीयांची देखील चौकशी केली जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
1034 कोटी रुपयांच्या पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी (Patra Chaal Scams) राऊत यांची चौकशी सुरू आहे. वरील तपासात असहकार केल्याचा आरोप आहे. 1 जुलै रोजी चौकशी केल्यानंतर त्यांना 20 आणि 27 जुलै रोजी समन्स बजावण्यात आले होते, परंतु संसदेचे अधिवेशन असल्याने ते 7 ऑगस्टनंतर हजर होतील, अशी माहिती त्यांच्या वकिलांमार्फत पाठवली. यापूर्वी 27 जुलै रोजी ईडीने राऊत यांना याप्रकरणी समन्स बजावले होते आणि चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते, मात्र राऊत हजर झाले नाहीत.
पेरू उत्पादक संकटाच्या छायेत! घटू शकते उत्पादन; करा हे उपाय, होईल फायदा
काय आहे पत्रा चाळ घोटाळा?
पत्रा चाळ घोटाळा मुंबईतील गोरेगाव (Goregaon) परिसराशी संबंधित आहे. हा महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. सुमारे 1034 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात संजय राऊत यांची 9 कोटी आणि राऊत यांची पत्नी वर्षा यांची 2 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
भावांनो शेळीपालनात यशस्वी होयचंय ना! तर या सामान्य चुका करणे टाळा आणि व्हाल मालामाल
रिअल इस्टेट व्यावसायिक प्रवीण राऊत (Praveen Raut) यांनी पत्रा चाळमध्ये राहणाऱ्या लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. एका बांधकाम कंपनीला या जमिनीवर 3000 फ्लॅट बांधण्याचे काम मिळाले. त्यापैकी ६७२ सदनिका येथे पूर्वीपासून राहणाऱ्या रहिवाशांना देण्यात येणार होत्या.
उर्वरित रक्कम म्हाडा आणि त्या कंपनीला द्यायची होती, परंतु 2011 मध्ये बांधकाम कंपनीने 1,034.79 कोटी रुपयांहून अधिक रक्कम बेकायदेशीरपणे कमावल्याचे तपासात उघड झाले. नंतर त्याने ही रक्कम बेकायदेशीरपणे त्याच्या साथीदारांकडे वर्ग केली.
महत्वाच्या बातम्या:
पीएम किसान लाभार्थ्यांनो सावधान! उद्या शेवटचा दिवस, करा हे काम अन्यथा येणार नाहीत पैसे
पशुपालकांनो सावधान! प्राण्यांमध्ये पसरत आहे हा रोग; अशी घ्या काळजी
Share your comments