1. इतर बातम्या

जन धन खातेधारकांना मोदी सरकार परत १५०० रुपये देणार ? सरकार तिसरं पॅकेज देण्याच्या तयारीत

कोरोना व्हायरसचा देशातील गरीब आणि मजूर वर्गातील लोकांना मोठा फटका बसला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना अनेकांना करावा लागला. यासाठी मोदी सरकार लॉकडाऊन केल्यानंतर ३० नोव्हेंबरपर्यंत रेशन मोफत देण्याचा निर्णय घेतला. हाच निर्णय आता मार्च २०२१ पर्यंत वाढविण्यात येईल, असा अंदाज आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


कोरोना व्हायरसचा देशातील गरीब आणि मजूर वर्गातील लोकांना मोठा फटका बसला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना अनेकांना करावा लागला. यासाठी मोदी सरकार लॉकडाऊन केल्यानंतर ३० नोव्हेंबरपर्यंत रेशन मोफत देण्याचा निर्णय घेतला. हाच निर्णय आता मार्च २०२१ पर्यंत वाढविण्यात येईल, असा अंदाज आहे. मोफत रेशन देण्यासह मोदी सरकारने जनधन खातेधारक महिलांना दरमहा ५०० रुपयांची आर्थिक मदत केली होती. ही मदत तीन महिन्यांसाठी सरकारकडून थेट महिलांच्या खात्यात टाकली जात होती. दरम्यान आता सणांचे दिवस आहेत ही बाब लक्षात घेता सरकार परत जनधन खातेधारकांच्या खात्यात १५०० रुपये पाठविणार असल्याची शक्यता आहे, याविषयीचे वृत्त प्रभाथ खबर या हिंदी भाषिक वृत्तसंस्थेने दिले आहे.

सणासुदीला कोणी दुखी राहू नये असा उद्देश सरकारचा आहे. राज्यातील शेतकऱ्यांना यंदाची दिवाळी मोठी दुखाची ठरत आहे, अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत, या दरम्यान सरकारचा हा निर्णय खूप महत्वाचा ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकार गरीब कुटुंबांसाठी तिसऱ्या पॅकेज देण्याची तयारी करत आहे. सरकार गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत धान्य आणि पैसे देण्याची घोषणा करु शकते.

कसे उघडाल जनधन खाते

पंतप्रधान जन धन योजनेच्या अंतर्गत झिरो बॅलन्स बचत खाते उघडले जाऊ शकते. यात आपल्याला चेकबुक आणि विम्यासह इतर सुविधा दिली जात आहे. कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन आपण आवश्यक कागदपत्रांची पुर्तंता केल्यास आपण खाते उघडू शकतात. जनधन खाते उघडण्यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट, वाहनचालक परवाना, याचा उपयोग आपल्या केवायसी पूर्ण करण्यासाठी करु शकतात. जर आपल्याकडे कागदपत्रे नाहीत तर तुम्ही आपला पासपोर्ट फोटो घेऊन स्वप्रमाणित फोटो घेऊन बँक अधिकाऱ्याकडे जाऊ शकतात आणि आपले खाते उघडू शकतात.

English Summary: Will Modi government give back Rs. 1500 to Jan Dhan account holders? , The government is preparing to give a third package Published on: 29 October 2020, 02:15 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters