पैसेवारी काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रत्येक गावात एक समिती तयार करण्यात येते. प्रत्येक गावाला तेथील मंडळ अधिकारी हे पदसिद्ध अध्यक्ष असतात तर समितीत तलाठी, ग्रामसेवक, सरपंच हे पदसिद्ध सदस्य असतात.तसेच या समितीमध्ये शेतकरी प्रतिनिधी म्हणून एक प्रगतिशील शेतकरी व दोन अल्पभूधारक शेतकरी यांची निवड केली जाते. यामध्ये एक महिला शेतकऱ्याचा समावेश असतो
यामध्ये शेतकरी प्रतिनिधींची निवड त्या गावची ग्रामपंचायत करत असते. त्यानंतर ही समिती गावातील हलकी,मध्यम व चांगली अशा प्रकारच्या शेतीची निवड करते. त्यानंतर ही समिती निवडलेल्या शेतीतील लावलेल्या पिकांची वाढ,पावसाचे प्रमाण, जमिनीचा प्रकार यांची नोंद घेतात. नोंदी घेताना शेतातील प्रमुख पिकांची यात निवड केली जाते.
कापसाचे नोंद घेताना दोन गुंठे जागा याचा निवडली जाते, निवडलेल्या दोन गुंठ्यातील कापसाची तीन ते सहा वेळेस वेचणी केली जाते व वेचणी झालेल्या कापसाचे वजन केले जाते.
त्यानंतर पिकाचा अंदाज काढला जातो. दुसरीकडे मक्का, बाजरी आणि ज्वारी यांची पैसेवारी काढताना या पिकांचीकणसेघेतली जातात. घेतलेल्या कणसांची स्थिती आणि त्यांचे वजन केले जाते. त्या वजनावरून पिकाची परिस्थिती आणि पैसे वारीचे अंदाज काढले जाते.त्यानंतर पहिल्यांदा ही पैसेवारी जाहीर केली जाते. जाहीर केलेल्या पैसेवारी वर काही आक्षेप असतील तर ते मागवले जातात.
जर नागरिकांनी यावर आक्षेप घेतला तर ही समिती गावात जाऊन वरील प्रमाणे पाहणी करते. त्यानंतर अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येते. खरीप पिकांची पैसेवारी 15 डिसेंबर च्या आत जाहीर केली जाते.प्रशासनाने जाहीर केलेल्या पैसेवारी वरून दुष्काळ जाहीर केले जातात. जर पैसेवारी 50 पैशांच्या आत असेल तर दुष्काळ समजलाजातो.( स्त्रोत- मॅक्स महाराष्ट्र)
Share your comments