आपण विविध प्रकारचे कागदपत्रांचा विचार केला तर यामध्ये आपल्याला आधार कार्ड आणि पॅन कार्ड सगळ्यांना माहिती आहे आणि हे दोन्ही कागदपत्रे सगळ्यांकडे आहेत. परंतु या दोन कागदपत्रांशिवाय टॅन कार्ड देखील आहे. नेमका या कार्डचा वापर कोणत्या ठिकाणी होतो आणि पॅन कार्ड आणि टॅन कार्ड यामधील फरक नेमका काय? याबद्दल या लेखात माहिती घेऊ.
नक्की वाचा:रेशन कार्ड धारकांना मिळणार मोफत आरोग्य उपचार, जाणून घ्या कसे
TAN कार्ड म्हणजे नेमके काय?
टॅनचे पूर्ण रूप म्हणजे कर वजावट आणि संकलन खाते क्रमांक होय आणि ते प्राप्तिकर विभागाने जारी केलेली असते. यामध्ये दहा अंकी अल्फान्यूमेरिक कोड असतो.
कर कपात करणाऱ्या किंवा वसूल करणाऱ्या सर्वांसाठी हे बंधनकारक आहे. जर आपण पॅन कार्ड आणि टॅन कार्ड मधील फरक समजून घेतला तर पॅन कार्ड हे करदात्यांसाठी बनवलेले असते तर टॅन कार्ड हे कर कपात करणाऱ्यांसाठी बनवलेले असते.
टॅन कार्डसाठी अर्ज कसा करायचा?
तुम्ही फॉर्म 49B द्वारे ऑनलाईन किंवा ऑफलाईन टॅन कार्डसाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला बासष्ट रुपये शुल्क लागते. हे पेमेंट तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड किंवा डिमांड ड्राफ्ट, चेक किंवा नेट बँकिंगद्वारे करू शकता. जर तुम्हाला या कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही एनएसडीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात.
पॅन कार्ड आणि टॅन कार्ड मधील फरक
पॅन म्हणजे परमनंट अकाऊंट नंबर तर टॅन म्हणजे टॅक्स डिडक्शन अकाउंट नंबर होय. त्याचा टॅक्स कापला जातो किंवा जमा केला जातो त्याच्याकडे टॅन क्रमांक असणे आवश्यक आहे. टीडीएसशी संबंधित सर्व कागदपत्रांसाठी आणि आयकर विभागाकडून टीडीएसशी संबंधित सर्व प्रकारांसाठी टॅन क्रमांक नमुद करणे आवश्यक आहे.
नक्की वाचा:अरे वा! एक लाखाचा लॅपटॉप मिळणार 40 हजार पेक्षा कमी किमतीत, भारताचे सेमीकंडक्टर करणार कमाल
Share your comments