अवघ्या काही मिनिटांतच होतो 300 कोटी लिटर्सहून अधिक पाऊस; अमरनाथ सारख्या भागांतच का होते ढगफुटी?एखाद्या छोट्याशा भागात कमी वेळात खूप जास्त पाऊस हण्याला ढगफुटी म्हणतात.यात ढग फुटण्यासारखे काहीच नसते. हो, पण पाऊस एवढा मुसळधार पडतो की, पाण्याने भरलेली पॉलिथीनची बॅग आकाशातून जमिनीवर पडल्याचा भास होतो. त्यामुळे या घटनेला मराठीत ढगफुटी व इंग्रजीत cloudburst म्हटले जाते.आता ढगफुटीचे गणित समजून घेऊया. हवामान खात्याच्या माहितीनुसार, 20 ते 30 चौरस किलोमीटर क्षेत्रात अचानक एका तासात किंवा त्याहून कमी वेळेत 100 एमएम किंवा त्याहून अधिक पाऊस झाला तर त्याला ढगफुटी म्हटले जाते. अनेकदा अवघ्या काही मिनिटांतच मुसळधार पाऊस होतो. येथे 'अचानक' या शब्दाला मोठे महत्व आहे. सामान्यतः ढगफुटी केव्हा होईल याचा अचूक अंदाज सांगणे फार अवघड असते.ढगफुटीचे हे गणित समजावून सांगण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता?
उत्तर : बिल्कुल. यासाठी सर्वप्रथम 1 मिलिमीटर पावसाचा अर्थ समजून घेऊया. पहा, 1 मिलिमीटर पाऊस होणे म्हणजे 1 मीटर लांब व 1 मीटर रुंद म्हणजे 1 चौरस मीटर क्षेत्रात 1 लिटर पाऊस होणे. आता या अर्थाने ढगफुटीकडे पाहिले तर जेव्हाही 1 मीटर लांब व 1 मीटर रुंद क्षेत्रात 100 लिटर किंवा त्याहून अधिक पाऊस झाला, तेही एक तास किंवा त्याहून कमी वेळेत, तर त्या भागात ढगफुटी झाली हे समजून घ्या.केवळ 100 लिटर!! हे गणित तर तुम्हाला फार किरकोळ वाटत असेल.याचा भयावहतेचा अंदाज लावण्यासाठी आपण हे समीकरण 1 चौरस मीटर ऐवजी 1 चौरस किलोमीटरच्या क्षेत्रासाठी वापरले तर जेव्हा 1 चौरस किलोमीटर क्षेत्रात एका तासाहून कमी वेळात 10 कोटी लिटर पाणी पडले, तर त्या भागात ढगफुटी झाल्याचे मानले जाते. म्हणजे अमरनाथमध्ये ढगफुटी झाली असेल तर त्या भागातील 20 ते 30 चौरस किलोमीटर क्षेत्रात एका तासाहून कमी वेळात 200 ते 300 कोटी लिटरहून अधिक पाऊस पडला असेल.पुढे सरकण्यापूर्वी ढगफुटीचा एक व्हायरल व्हिडिओ पहा. हा व्हिडिओ वंडर ऑफ सायंस नामक ट्विटर हँडलने पोस्ट केला आहे.
कॅप्शनमध्ये हा व्हिडिओ ऑस्ट्रियाच्या लेक मिल्स्टॅटचा असून, तो पीटर मायर यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्याचे नमूद करण्यात आले आहे.ढगफुटी व मुसळधार पावसात काय फरक आहे?उत्तर : वर सांगितल्याप्रमाणे या फार मोठे अंतर नाही. पण जेव्हाही 20 ते 30 चौरस किलोमीटर क्षेत्रात एका तासाहून कमी वेळेत 100 mm किंवा त्याहून अधिकि पाऊस झाला तर त्याला ढगफुटी म्हटले जाते.तीव्रता सोडली तरी या दोन्ही घटनांतील सर्वात मोठे अंतर म्हणजे मुसळधार पावसाचा अंदाज लावता येतो. पण ढगफुटीचा नाही. म्हणजे ढगफुटीनंतर अचानक व अतिमुसळधार पाऊस होतो. याशिवाय सामान्यतः डोंगराळ भागातच ढगफुटी होते. भारताच्या दृष्टिकोनातून बोलायचे झाले तर अशा घटना नेहमीच हिमालयाच्या डोंगररांगात घडतात.आता मला सांगा ढगफुटी का होते?उत्तर : सर्वप्रथम ढगांची माहिती घेऊ. ढग हे मुख्यत्वे सूर्याच्या उष्णतेमुळे महासागरावर तयार झालेले वाफेचे ढग असतात. ते समुद्राच्या ओलसर वाऱ्यांसोबत वाहून जमिनीच्या दिशेने येतात.
दाट ढग असलेली ही आर्द्र हवा जेव्हा समुद्रातून जमिनीवर पोहोचते, तेव्हा आपण मान्सूनचे आगमन झाल्याचे सांगतो.आता सीन क्रमांक दोनकडे वळून पाऊस समजून घेऊ. फ्रीजचे थंड पाणी जेव्हा ग्लास किंवा भांड्यात भरले जाते तेव्हा त्याच्या पृष्ठभागावर पाणी साचते हे तुम्ही सर्वांनी पाहिले असेल. त्याचप्रमाणे वरच्या वातावरणातील ढग थंड झाल्यावर त्यांचे थेंबात रूपांतर होते. त्यालाच पाऊस म्हणतात.त्यचे असे होते की, मान्सूनच्या वाऱ्याचे ढग हिमालयाला धडकून त्यांची एकाच ठिकाणी गर्दी होते. या प्रकरणी एक वेळ अशी येते की, एखाद्या भागावर घिरट्या घालणारे हे ढग पाण्याने भरलेल्या पिशवीसारखे अचानक फुटतात. म्हणजेच, एका छोट्या क्षेत्रात खूप वेगाने पाऊस पडतो. हीच तर आहे ढगफुटी.बद्रीनाथ व केदारनाथ सारख्या उंच भागांतच ढगफुटी का होते?उत्तर : बद्रीनाथ हिमालयात 3300 तर केदारनाथ 3583 मीटर उंचीवर आहे. मागील प्रश्नाच्या उत्तरात अगोदरच सांगितल्याप्रमाणे, हिमालयाला आदळल्यानंतर मान्सूनचे ढग हळूहळू मोठ्या प्रमाणात जमा होतात आणि ढगफुटीचे वातावरण तयार होते. त्यामुळेच अशा हिमालयीन भागात अनेकदा ढगफुटी होते.
पण, याचा अर्थ असा नाही की मैदानी भागांत ढगफुटी होत नाही.आता पहा अमरनाथ गुहेजवळ झालेल्या ढगफुटीमुळे झालेल्या विनाशाचा व्हिडिओ.कोणत्या महिन्यांत ढगफुटीचा सर्वाधिक धोका असतो?उत्तर : दक्षिण भारतातील केरळमध्ये मान्सून 1 जूनमध्ये सर्वप्रथम धडकतो. सागरी ओलावा व ढग असलेले हे वारे जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हिमालयापर्यंत पोहोचतात. मान्सूनही जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये सर्वाधिक सक्रिय असतो. यामुळेच हिमालय असो किंवा मैदानी भाग सर्वत्र जुलै, सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये अनेकदा ढगफुटी होते.मानवामुळे होणाऱ्या हवामान बदलाचा म्हणजे क्लायमेट चेंजचा ढगफुटीशी काही संबंध आहे का?उत्तर: अनेक संशोधनांद्वारे हवामान बदलामुळे ढगफुटीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे व त्यांची तीव्रता वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जागतिक हवामान संघटनेने मे 2021 च्या आपल्या अहवालात पुढील 5 वर्षांत जगाच्या सरासरी तापमानात 1.5 अंश सेल्सिअची वाढ होण्याची भीती व्यक्त केली आहे.तापमानाच्या वाढीच्या दरानुसार हिमालयीन भागात ढगफुटीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. ढगफुटीच्या वाढत्या घटनांमुळे अचानक पूर येणे, दरडी कोसळणे, मातीची धूप होणे आणि जमीन खचण्याच्या घटनांत मोठी वाढ होत आहे.
Share your comments