काही दिवसांपुर्वी अलिगड् मुस्लिम विद्यापीठाच्या शताब्दी वर्ष समारंभ पार पडला. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत असताना त्यांनी सरकारच्या विविध कामाविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी आयुष्यमान भारत योजना उल्लेख केला. बोलताना ते म्हणाले की, या योजनेच्या अंतर्गत ५० कोटी लोकांवर ५ लाखापर्यंतचे मोफत इलाज केले आहेत. नेमकी काय आहे योजना? तुम्ही या योजनेचा लाभ घेतला आहे का? जर नाही, तर सरकारकडून एक टोल फ्री नंबर जारी करण्यात आला आहे. त्या नंबरद्वारे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.
14555/1800111565 हा टोल फ्री नंबर डायल केला तर तुम्हाला बरेच गोष्टींविषयी माहिती दिली जाते. जसे की, या योजनेत तुमच्या परिवारास नाव आहे का? या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पात्र आहात का? अशा प्रश्नाचे उत्तर तात्काळ मिळतात. इतकेच नाही तर तुम्ही कॉमन मिनिमम सेंटरचे देखील मदत घेऊ शकता. या योजनेअंतर्गत तुम्हाला हॉस्पिटलमध्ये भरती होण्यापासून उपचार रक्त संपूर्ण सहकार्य मिळते.
या योजनेसाठी असलेली तुमची पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही पात्रता तपासू शकता.
https//mera.ppmjay.gov.in/search/login
आयुष्यमान भारत योजना अंतर्गत जवळजवळ 1300 आजारावर उपचार केले जातात. या योजनांतर्गत कोरोना चा देखील मोफत इलाज केला जातो.. तसेच कॅन्सर, ओपन हार्ट सर्जरी, न्यूरो सर्जरी, प्लास्टिक सर्जरी इत्यादी महागड्या उपचारांच्या आजारावर उपचार केला जातो.
काय आहेत या योजनेचे फायदे?
या योजनेच्या अंतर्गत क्लीनिकल उपचार, आरोग्य उपचार आणि औषधे रुग्णालयात दाखल होण्याचा अगोदर तीन दिवस आणि रुग्णालयात दाखल झाल्याचा पंधरा दिवस उपलब्ध असतील. विशेष म्हणजे या योजनेमध्ये कुटुंबातील सदस्यांची संख्या त्यांचे वय आणि लिंग यांचे कोणतेही बंधन नाही. पी एम जे ए आय पोर्टलवर योजना असून लाभार्थी देशभरातील कोणते सार्वजनिक खाजगी सूचीमध्ये असलेल्या रुग्णालयात त्याचा लाभ घेऊ शकतात.
Share your comments