आधार कार्ड सगळ्यात महत्त्वाच्य कागदपत्रां पैकी एक आहे. कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी, कुठल्याही कामामध्ये आधार कार्डची आवश्यकता आहे.आधार कार्ड सगळ्यात महत्त्वाच्या कागदपत्रांत पैकी एक आहे. सरकारमध्ये आपला डेमोग्राफिक बायोमेट्रिक डेटा समाविष्ट असतो. या लेखात आपण ब्ल्यू कलर आधार कार्ड नेमके काय असते? त्याबद्दल माहिती घेणार आहोत.
ब्ल्यू कलर आधार कार्ड
ज्या मुलांचे वय पाच वर्षापेक्षा कमी असते अशा मुलांसाठी असलेले आधार कार्ड म्हणजे ब्लू आधार कार्ड किंवा बाल आधार कार्ड होय. हे आधार कार्ड लहान मुलांचे वय पाच वर्ष झाल्यानंतर अवैध ठरते. लहान मुलांसाठी ब्ल्यू आधार कार्ड काढण्यासाठी शाळेचे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. ब्ल्यू आधार कार्ड चे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये लहान मुलांचे बायोमेट्रिक अपडेट केलेले नसते. त्यामुळे जेव्हा मूल पाच वर्षाचे होते तेव्हा त्याचे बायोमेट्रिक अपडेट करणे अनिवार्य आहे. नाहीतर ब्लू आधार कार्ड अवैध ठरवले जाते.
ब्लू कलर आधार कार्ड काढण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे
- लहानमुलांचा जन्माचा दाखला किंवा शाळेचे ओळखपत्र आवश्यक असते.
- लहान मुलाच्या आई किंवा वडिलांचे आधार कार्ड आवश्यक.
लहान मुलांचे आधार कार्ड काढताना फिंगरप्रिंट किंवा आय स्कॅन केले जात नाही.जेव्हा ही मुलं पाच वर्षाची होतात तेव्हा त्यांचे दहा बोटांचे आणि डोळ्यांचे बायोमेट्रिक अपडेट करणे गरजेचे असते.( माहिती स्त्रोत- लेटेस्ट ली)
Share your comments