बदलत्या काळात लोकांच्या आवडी निवडी देखील बदलू लागल्या आहेत. आता अनेक नवयुवक नोकरी करण्याएवजी व्यवसाय करण्याचे स्वप्न रंगवू लागले आहेत. मात्र असे असले तरी या व्यवसाय करू इच्छिणाऱ्या नव युवकांना योग्य ते कल्पना सुचत नसल्याने त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात मात्र काही खरे उतरत नाही. त्यामुळे आम्ही या नवयुवकांच्या समस्या जाणून आज एका भन्नाट व्यवसायाची कल्पना घेऊन हजर झालो आहोत.
मित्रांनो कोणताही व्यवसाय अलीकडच्या काळात स्पर्धेचा बनला आहे. मात्र आज आम्ही आपणास ज्या व्यवसायाची माहिती देणार आहोतत्या व्यवसायात अद्याप तरी एवढी स्पर्धा बघायला मिळत नाही. यामुळे अल्प कालावधीत श्रीमंत होण्याचा हा एक उत्तम मार्ग बनू शकतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमका हा व्यवसाय आहे तरी कोणता? चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी.
मित्रांनो आम्ही ज्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत तो व्यवसाय आहे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीचा व्यवसाय. आता तुम्ही म्हणत असाल पेट्रोल पंप उघडणे हे प्रत्येकाला शक्य नाही; बरोबर! मात्र आम्ही पंप उघडून नव्हे तर ऑनलाइन डिलिव्हरीद्वारे.
पेट्रोल-डिझेल विक्रीच्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत. जसं की आपणास ठाऊकच आहे देशातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे साहजिकच पेट्रोल पंपावरील गाड्यांची गर्दीही वाढत आहे. इंधनासाठी लोकांना लांबच-लांब रांगेत उभे राहावे लागते. अशा परिस्थितीत त्यांना पेट्रोल किंवा डिझेलची होम डिलिव्हरी मिळाली तर लोक निश्चितच या सुविधेचा फायदा घेतील. यामुळे तुम्ही देखील या संधीचे सोने करा आणि हा व्यवसाय लवकरात लवकर सुरू करा.
या व्यवसायाला शासनाने दिली आहे परवानगी- मित्रांनो जर आपण हा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक असाल तर आम्ही सांगू इच्छितो की, यासाठी तुम्हाला पेट्रोलियम कंपन्यांची परवानगी घ्यावी लागेल. सुरुवातीची ही आव्हाने पार केल्यानंतर, तुम्हाला यामध्ये चांगला नफा मिळेल आणि तुम्ही खूप कमी वेळात लखपती होऊ शकता. मित्रांनो आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, 2016 मध्ये सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या होम डिलिव्हरीला परवानगी दिली आहे. यामुळे हा व्यवसाय पूर्ण लिगल स्वरूपाचा आहे.
या व्यवसायासाठी तंत्रज्ञानाची सांगड घालावी लागेल - जर आपणांस हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला यासाठी तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागणार आहे. साहजिकच ऑनलाइन व्यवसाय अँप किंवा वेबसाइटच्या माध्यमातून हा व्यवसाय सुरू करावा लागणार आहे.
यासाठी तुम्हाला वेबसाइट किंवा अँप तयार करावे लागेल. तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा तपशीलवार अहवाल तयार करावा लागेल. ज्यामध्ये तुमच्या व्यवसायाची कल्पना, उत्पन्न, खर्च सर्वकाही असेल. तुम्ही हा अहवाल तेल कंपन्यांकडे घेऊन जाल आणि त्यांनी तो मंजूर केला की मग तुम्ही ऑनलाइन पद्धतीने पेट्रोल आणि डिझेल विक्री सुरू करू शकता.
किती गुंतवणूक करावी लागेल- जर आपणांस हा व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्हाला या व्यवसायासाठी 12 लाख रुपयांपर्यंत सुरवातीला गुंतवणूक करावी लागेल असा अंदाज तज्ज्ञांद्वारे सांगितला गेला आहे. मात्र जर तुम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातील असाल आणि तुमच्याकडे एवढी मोठी रक्कम नसेल तर तुम्ही कर्ज घेऊ शकता. पीएम मुद्रा लोन अंतर्गत तुम्ही 10 लाख रुपयांचे कर्ज घेऊन हा व्यवसाय निश्चितच सुरू करू शकता. एकदा व्यवसाय सुरू झाला की, हे कर्ज सहजपणे फेडता येते आणि तुमचे उत्पन्न निश्चितचं लाखों रुपयांचे होऊ शकते.
कुठं सुरु आहे हा व्यवसाय- मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, उत्तर प्रदेश राज्यात हा व्यवसाय मोठ्या दिमाखात सुरू आहे. युपीमधील नोएडा शहरात हा ऑनलाइन इंधन व्यवसाय चांगला फुलला आहे. या ठिकाणी पेपफ्युएल नावाची कंपनी पेट्रोल आणि डिझेलची होम डिलिव्हरी करते. विशेष म्हणजे या कंपनीचा हा ऑनलाइन पेट्रोल डिझेल विक्रीचा व्यवसाय 100 कोटींच्या पुढे गेला आहे. निश्चितच आपण देखील या व्यवसायाची सुरुवात करून लाखो रुपयांची कमाई सहज करू शकता.
Share your comments