महाराष्ट्रात फळ पिकांसाठी हवामान आधारित फळ पिक विमा योजना सन 2011 पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. सन 2018-19 मध्ये द्राक्ष, संत्रा, मोसंबी, डाळिंब, केळी, आंबा, काजू, पेरू व लिंबू पिकांचा अंबिया बहाराकरिता ही योजना राबविण्यात येत आहे. सदर योजना विमा कंपन्यांच्या माध्यमांतून प्रत्येक पिकनिहाय अधिसूचित जिल्ह्यांतील अधिसूचित तालुक्यांमध्ये राबविण्यात येणार आहे व नुकसान भरपाईची रक्कम विमा कंपनी मार्फत शेतकऱ्यांस दिली जाणार आहे.
योजनेची वैशिष्ट्ये:
- कमी / जास्त पाऊस, वेगाचा वारा, गारपीट व सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देणे.
- फळपिक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैैर्य आबधित राखणे.
हेही वाचा:‘या’ कारणांमुळे आंबा उत्पादन कमी होण्याची शक्यता
या योजनेंतर्गत जिल्हानिहाय काम करणाऱ्या विमा कंपन्या पुढीलप्रमाणे:
अ. क्र |
समाविष्ट जिल्हे |
विमा कंपनीचे नाव व पता |
१ |
समूह १: वाशिम, वर्धा, जालना, पुणे, रत्नागिरी, लातूर व अकोला
|
दि न्यू इन्डिया एश्योरन्स कंपनी |
२ |
समूह २: ठाणे, कोल्हापूर, परभणी, यवतमाळ, नाशिक व हिंगोली समूह ३: रायगड, धुळे, नागपूर, जळगाव, सोलापूर, सिंधुदुर्ग, सातारा, उस्मानाबाद व नंदुरबार समूह ४: बुलढाणा, औरंगाबाद, अहमदनगर, अमरावती, पालघर, सांगली, नांदेड व बीड |
अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि. |
या योजनेसाठी विविध वित्तीय संस्थांकडे पिक कर्जासाठी अर्ज केलेल्या व ज्यांची अधिसूचित फळ पिकांसाठी पिक कर्ज मर्यादा मंजूर आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना ही योजना सक्तीची राहील.
बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक राहील.
योजनेमध्ये सहभागी झालेल्या कर्जदार / बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी या योजेनेतील गारपीट या हवामान धोक्यासाठी सहभाग ऐच्छिक राहील.
शेतकऱ्यांनी भरावयाचा जास्तीत जास्त विमा हप्ता विमा संरक्षित रकमेच्या 5 टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जी कमी असेल ती रक्कम.
विमा संरक्षित रक्कम आणि शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता:
पिक |
विमा संरक्षित रक्कम रु. (प्रती हेक्टरी) |
विमा दरात शेतकरी हिस्सा रु. (प्रती हेक्टरी) |
द्राक्ष |
३,०८,०००/- |
१५,४००/- |
डाळींब |
१,२१,०००/- |
६,०५०/- |
मोसंबी |
७७,०००/- |
३,८५०/- |
पेरू |
५५,०००/- |
२,७५०/- |
केळी |
१,३२,०००/- |
६,६००/- |
संत्रा |
७७,०००/- |
३,८५०/- |
काजू |
८३,६००/- |
४,१८०/- |
आंबा |
१,२१,०००/- |
६,०५०/- |
लिंबू |
६६,०००/- |
३,३००/- |
संबंधित शासन निर्णय पाहण्यासाठी: प्रधानमंत्री फसल बीमा योजनेंतर्गत राज्यात पुनर्रचित हवामान आधारित पिक विमा योजना 2018-19 मध्ये अंबिया बहाराकरिता लागू करण्याबाबत
संरक्षित रक्कम आणि शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता: (ऐच्छिक गारपीटीकरिता)
पिक |
विमा संरक्षित रक्कम रु. (प्रती हेक्टरी) |
विमा दरात शेतकरी हिस्सा रु. (प्रती हेक्टरी) |
द्राक्ष |
१,०२,६६७/- |
५,१३३/- |
डाळींब |
४०,३३३/- |
२,०१७/- |
मोसंबी |
२५,६६७/- |
१,२८३/- |
पेरू |
१८,३३३/- |
९१७/- |
केळी |
४४,०००/- |
२,२००/- |
संत्रा |
२५,६६७/- |
१,२८६/- |
काजू |
२७,८६७/- |
१,३९३/- |
आंबा |
४०,३३३/- |
२,०१७/- |
लिंबू |
२२,०००/- |
१,१००/- |
पीकनिहाय विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत:
- द्राक्ष: 15 ऑक्टोबर
- डाळिंब, मोसंबी, पेरू व केळी: 31 ऑक्टोबर
- लिंबू: 14 नोव्हेंबर
- संत्रा, काजू: 30 नोव्हेंबर
- आंबा: 31 डिसेंबर
योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी सादर करावयाची कागदपत्रे:
- ७/१२ (७/१२ वर फळबागेचा उल्लेख)
- ८-अ
- फळबाग लागवड दाखला
- बँक पासबुक झेरॉक्स
- आधार कार्ड झेरॉक्स
- संरक्षित रक्कम विमा हप्ता इत्यादी.
या योजनेच्या अधिक माहितीकरिता संबंधित तालुका कृषी अधिकारी, उप विभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किंवा संबंधित विमा कंपनीकडे संपर्क साधावा.
Share your comments