ही योजना आंबा पिकासाठी अधिसुचित जिल्ह्यामधील, अधिसुचित तालुक्यातील, अधिसुचित महसूल मंडळात लागू आहे. यानुसार निवडलेल्या विमा कंपनी मार्फत अधिसूचित महसूल मंडळ पातळीवर शासनमान्य संदर्भ हवामान केंद्र आकडेवारी वरुन नुकसान भरपाई अंतिम केली जाते.
समाविष्ट जिल्हे (२३): ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना, पुणे, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, परभणी, नांदेड, वाशिम, धुळे, बुलढाणा, जळगाव, नाशिक, सांगली, कोल्हापूर, नंदुरबार इत्यादी.
|
विमा योजनेत सहभाग प्रक्रिया: कर्जदार शेतकरी: अनिवार्य सहभाग, बँकाकडून आंबा पिकासाठी कर्ज मंजूर असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा विमा हा त्या त्या बँकाकडून देण्यात येणाऱ्या कर्ज पुरवठा रकमेमधून भरला जाईल. या योजनेतंर्गत आंबा पिकास निवडलेल्या विमा कंपनी मार्फत खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पिक नुकसानीस (आर्थिक) खालील प्रमाणे विमा संरक्षण प्रदान होईल.
|
||||||||||||
|
गारपीट हवामान धोक्यापासून विमा संरक्षण घेण्याची बाब ऐच्छीक आहे. गारपीटीने नुकसान झाल्यास 48 तासाच्या आत संबंधित विमा कंपनीला कळवावे. |
योजना कार्यान्वित करणारी यंत्रणा:
सदर फळपिक विमा योजना खालील यंत्रणेमार्फत खालील जिल्हयातील आंबा फळपिकासाठी अधिसूचित केलेल्या महसूल मंडळ पातळीवर कार्यान्वित करण्यात येईल.
| अ.क्र. | विमा कंपनीचे नाव | जिल्हे | एकूण जिल्हे |
| 1 | दि न्यू इंडिया इन्शुरेंस कंपनी फोन क्र. ०२२-२२७०८१०० टोल फ्री.क्र. १८०० २०९१ ४१५ ईमेल: [email protected] |
वाशिम, जालना, पुणे, रत्नागिरी, लातूर | 5 |
| 2 | अॅग्रिकल्चर इन्शुरेंस कंपनी ऑफ इंडिया लि. फोन क्र. ०२२-६१७१०९१२ टोल फ्री.क्र. १८०० १०३० ०६१ ईमेल: [email protected] |
ठाणे, कोल्हापूर, परभणी, नाशिक, रायगड, धुळे, जळगाव, सोलापूर, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नंदुरबार, बुलढाणा, औरंगाबाद, अहमदनगर, पालघर, सांगली, नांदेड, बीड | 18 |
आंबा पिकाच्या बाबतीत जिल्हानिहाय हवामान धोके, संरक्षण कालावधी व निकष वेगवेगळे असल्याने या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकर्यांनी संबंधित विमा कंपनी, संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधून अधिक सविस्तर माहिती घ्यावी आणि योजनेत सहभाग घ्यावा.
श्री. विनयकुमार आवटे
अधिक्षक कृषि अधिकारी (मनरेगा), पुणे विभाग
9404963870
Share your comments