सन 2011-12 पासून राज्यात फळपिक विमा योजना राबविणेत येते आहे. सदर योजना अधिसूचित फळपिकांसाठी, अधिसूचित केलेल्या जिल्हयामधील, तालुक्यातील, महसूल मंडळात राबविण्यात येते. सदर योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या निर्देशित हवामान केंद्र येथे नोंदल्या गेलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देईल. सन 2019-20 मध्ये हि योजना द्राक्ष, डाळिंब, संत्रा, आंबा, मोसंबी, केळी, काजू या 7 फळ पिकांसाठी अंबिया बहारात गारपीट आणि इतर विविध हवामान धोक्यांपासून संरक्षण देण्यासाठी राबविण्यात येत आहे.
योजनेची उद्दिष्ट्ये:
- पाऊस, तापमान, वेगाचे वारे, गारपीट या हवामान धोक्यापासून फळपिकांना निर्धारीत केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देणे.
- फळपिक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.
- शेतकर्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.
योजना कार्यान्वित करणारी यंत्रणा
सदर फळपिक विमा योजना खालील यंत्रणेमार्फत खालील जिल्हयातील विविध फळपिकांसाठी अधिसूचित केलेल्या महसूल मंडळ पातळीवर कार्यान्वित करण्यात येते.
अ. क्र |
समाविष्ट जिल्हे |
विमा कंपनीचे नाव व पता |
१ |
समूह- १: सोलापूर, अहमदनगर, जालना, पुणे, पालघर, सातारा, नांदेड, नागपूर, यवतमाळ. |
भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड. |
शेतकर्यांचा योजनेतील सहभाग:
- विविध वित्तीय संस्थांकडून ज्यांनी अधिसूचित फळपिकासाठी पिक कर्ज घेतले आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना ही योजना सक्तीची राहील. मात्र गारपीट या हवामान धोक्यासाठी सहभाग ऐच्छिक आहे.
- बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक आहे.
- फळपिकाखालील किमान २० हेक्टर किंवा जास्त उत्पादनक्षम क्षेत्र असणाऱ्या महसूल मंडळात ही योजना राबविण्यात येते, मात्र सदर मंडळ शासनामार्फत अधिसूचित होणे आवश्यक असते.
अधिसूचित फळपिकांच्या विमा मधील समाविष्ट हवामान धोके, विमा संरक्षण कालावधी, फळपिक निहाय प्रती हेक्टर सर्वसाधारण विमा संरक्षण, गारपीट संरक्षण रक्कम आणि शेतकर्याने भरावयाचा विमा हप्ता
अ.क्र. |
फळपिके |
समाविष्ट धोके |
विमा संरक्षण कालावधी |
विमा संरक्षण रक्कम |
शेतकर्याने भरावयाचा |
|
१ |
द्राक्ष |
अवेळी पाऊस |
८ नोव्हेंबर, २०१९ |
३१ मार्च, २०२० |
३०,८०००/- |
१५,४००/- |
दैनंदिन कमी तापमान |
१ डिसेंबर, २०१९ |
२८ फेब्रुवारी, २०२० |
||||
गारपीट |
१ जानेवारी, २०२० |
३० एप्रिल, २०२० |
१,०२,६६७/- |
५,१३४/- |
||
२ |
संत्रा |
अवेळी पाऊस |
१ डिंसेबर, २०१९ |
१५ जानेवारी, २०२० |
७७,०००/- |
३,८५०/- |
कमी तापमान |
१६ जानेवारी, २०२० |
२८ फेब्रुवारी, २०२० |
||||
जादा तापमान |
१ मार्च, २०२० |
३१ मार्च, २०२० |
||||
जादा तापमान |
१ एप्रिल, २०२० |
३१ मे, २०२० |
||||
गारपीट |
१ जानेवारी, २०२० |
३० एप्रिल, २०२० |
२५,६६७/- |
१,२८४/- |
||
३ |
मोसंबी |
अवेळी पाऊस |
१ नोव्हेंबर, २०१९ |
३१ डिसेंबर, २०१९ |
७७,०००/- |
३,८५०/- |
जास्त तापमान |
१ मार्च, २०२० |
३१ मार्च, २०२० |
||||
जास्त पाऊस |
१५ ऑगस्ट, २०२० |
१५ सप्टेंबर, २०२० |
||||
गारपीट |
१ जानेवारी, २०२० |
३० एप्रिल, २०२० |
२५,६६७/- |
१,२८४/- |
||
४ |
डाळिंब |
अवेळी पाऊस |
१५ जानेवारी, २०२० |
३१ मे, २०२० |
१,२१,०००/- |
६,०५०/- |
जादा तापमान |
१ एप्रिल, २०२० |
३१ मे, २०२० |
||||
जादा पाऊस |
१ जून, २०२० |
३१ जुलै, २०२० |
||||
गारपीट |
१ जानेवारी, २०२० |
३० एप्रिल, २०२० |
४०,३३३/- |
२,०१७/- |
||
५ |
केळी |
कमी तापमान |
१ नोव्हेंबर, २०१९ |
२८ फेब्रुवारी, २०२० |
१,३२,०००/- |
६,६००/- |
वेगाचा वारा |
१ मार्च, २०२० |
३१ जुलै, २०२० |
||||
जास्त तापमान |
१ एप्रिल, २०२० |
३१ मे, २०२० |
||||
गारपीट |
१ जानेवारी, २०२० |
३० एप्रिल, २०२० |
४४,०००/- |
२,२००/- |
||
६ |
काजू |
अवेळी पाऊस |
१ डिसेंबर, २०१९ |
२८ फेब्रुवारी, २०२० |
८५,०००/- |
४,२५०/- |
कमी तापमान |
१ डिसेंबर, २०१९ |
२८ फेब्रुवारी, २०२० |
||||
गारपीट |
१ जानेवारी, २०२० |
३० एप्रिल, २०२० |
२८,३३३/- |
१,४१७/- |
||
७ |
आंबा (कोकण) |
अवेळी पाऊस |
१ डिसेंबर, २०१९ |
१५ मे, २०२० |
१,२१,०००/- |
६,०५०/- |
कमी तापमान |
१ जानेवारी, २०२० |
१० मार्च, २०२० |
||||
वेगाचा वारा |
१६ एप्रिल, २०२० |
१५ मे, २०२० |
||||
जास्त तापमान |
मार्च, २०२० |
१५ मे, २०२० |
||||
गारपीट |
१ फेब्रुवारी, २०२० |
३१ मे, २०२० |
४०,३३३/- |
२,०१७/- |
||
आंबा (इतर जिल्हे) |
अवेळी पाऊस |
१ जानेवारी, २०२० |
३१ मे, २०२० |
१,२१,०००/- |
६,०५०/- |
|
कमी तापमान |
१ जानेवारी, २०२० |
२८ फेब्रुवारी, २०२० |
||||
वेगाचा वारा |
१ एप्रिल, २०२० |
३१ मे, २०२० |
||||
जास्त तापमान |
मार्च, २०२० |
३१ मार्च, २०२० |
||||
गारपीट |
१ फेब्रुवारी, २०२० |
३१ मे, २०२० |
४०,३३३/- |
२,०१७/- |
विमा हप्ता अनुदान: या विमा योजनेत भाग घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेच्या केवळ ५ टक्के विमा हप्ता आहे. या व्यतिरिक्त वाढीव विमा हप्ता हे केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान म्हणून दिले जाते.
फळपिकनिहाय योजनेत भाग घेण्यासाठी अंतिम मुदत पुढीलप्रमाणे
फळपिक |
अंतिम तारीख |
द्राक्ष |
७ नोव्हेंबर, २०१९ |
मोसंबी |
|
केळी |
|
संत्रा |
३० नोव्हेंबर, २०१९
|
काजू |
|
आंबा (कोकण) |
|
आंबा (इतर जिल्हे) |
३१ डिसेंबर, २०१९ |
डाळिंब |
१४ जानेवारी, २०२० |
या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकर्यांनी Common Service Center (CSC) मार्फत ऑनलाईन अर्ज भरावेत, सोबत ७/१२, आधार कार्ड, बँक खाते तपशील असणे आवश्यक आहे. अधिक महितीसाठी भारतीय कृषी विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी, कृषी विभाग संकेत स्थळ www.krishi.maharashtra.gov.in कडे संपर्क साधून अधिक सविस्तर माहिती घ्यावी.
लेखक:
श्री. विनयकुमार आवटे
(अधिक्षक कृषी अधिकारी, मनरेगा, पुणे विभाग)
9404963870
Share your comments