ऑनलाईन प्रणाली आल्यामुळे सर्वच क्षेत्रातील कामे ही जलद होतात. ऑनलाईनमुळेच रेशन कार्डवरील अपडेट करणे आता सोपे झाले आहे. जर आपल्या रेशन कार्डवरील नाव कपात झाले असेल तर नागरिकांनो घाबरू नका. ग्रामीण भागातील अनेक नागरिकांच्या घरी धान्य येत असते. जर रेशन कार्डवर काही चुकी झाली किंवा काही त्रुटी निघाली का अनेकजण चिंता करतात. परंतु मोदी सरकार आपल्याला एक संधी घेऊ येत आहे, या संधीतून आपण आपल्या कार्डवरील हवी ती माहिती अद्यावत करु शकतो. दरम्यान राज्य सरकार कडून रेशन कार्ड नागरिकांना दिले जाते. नवीन तयार झालेल्या कार्डवरील काहींची नावे ही कापण्यात आली आहेत. ज्या व्यक्तींची नावे कापण्यात आली आहेत ते व्यक्ती दावा करुन आपले नाव रेशन कार्डशी जोडू शकतात.
रेशन कार्डमधून नाव का कापले जाते ?
अनेक कारणांमुळे रेशनकार्डमधील नावे कापली जातात. याचे एक कारण म्हणजे आपले नाव आधीच दुसऱ्या रेशन कार्डमध्ये नाव असणे. आपले आधार कार्ड रेशन कार्डशी जोडलेले नसणे. समजा आपल्या घर प्रमुखाचा मृत्यू झाला असेल तर आपण नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करु शकतो.
लग्नानंतर पत्नीचं नाव रेशन कार्डमध्ये दाखल करायचंय ?
जर आपले लग्न झाले असेल आणि आपल्या पत्नीचे नाव कार्डवर दाखल करायचे असेल तर त्यासाठी एक सोपी पद्धत आहे. यासाठी आपल्याकडे दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजे. दोन्ही जण वेगवेगळं रेशन कार्ड बनवू शकतात. किंवा आधार कार्डवरील आपले नाव दुरुस्त करून रेशन कार्डमध्ये आपले नाव दाखल करु शकता. म्हणजे मुलीच्या नावात वडिलांच्या नावाच्या जागेवर नवऱ्याचे नाव लिहावे. त्यानंतर आपल्या पत्नीचे आधार कार्ड घेऊन आपण थेट तहसील कार्यालयातील खाद्य विभागातील अन्न पुरवठा विभागात जावे. आपल्याकडील आधार कार्ड त्यांना द्यावे. नाव जोडायचे आहे किंवा कपात करायचे आहे हे सांगावे.
ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्डवर जोडा पत्नीचे नाव
ज्या रेशनकार्डवर आपले नाव आहे, त्यावर आपल्या पत्नीचे नाव जोडायचे आहे. तर पत्नीच्या आधार कार्डवर नावाची दुरुस्ती करावी. त्यानंतर आधार जन सुविधा केंद्रात जाऊन आपण आधार जमा करावे. ऑनलाईन पडताळणी झाल्यानंतर पत्नीचे नाव रेशन कार्डवर जोडले जाईल. आधार कार्डवरील पत्नीचे नाव बदलण्यासाठी आपल्याला लग्नाचा पुरवा लागेल. यासाठी आपण लग्नाची पत्रिका देऊ शकता. ग्रामपंचायतीमधील नोंद आपण येथे दाखवू शकता.
रेशन कार्डवरील नाव कापले गेले असेल तर कसे जोडणार?
दरम्यान केंद्र सरकारने पुर्ण देशात वन नेशन वन रेशन कार्ड पोर्टेबिलिटीची सुविधा सुरू केली आहे. आतापर्यंत देशातील २६ राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात ही सुविधा सुरू आहे. या सुविधेमुळे दुसऱ्या राज्यातील नागरिकांनाही परराज्यात धान्य मिळू शकते.
जर एखाद्या व्यक्तीचे नाव रेशन कार्डमधून कापण्यात आले असेल तर आपल्या जवळील सेवा केंद्रात जाऊन रेशन कार्डची एक फोटो कॉपी द्यावी. जन सेवा केंद्रात आपल्याला एक पावती मिळेल ती पावती घेऊन तहसील कार्यालयात जमा करावी. तहसील कार्यालयात ही पावती पुरवठा विभागात जमा करावी लागेल. काही दिवसानंतर आपल्याला रेशन कार्ड मिळेल आणि त्यात त्या व्यक्तीचे नाव जोडलेले दिसेल.
Share your comments