1. इतर बातम्या

स्कूटर खरेदी करायची आहे का? मग, जाणून घ्या भारतातल्या दमदार मायलेजवाल्या आणि स्वस्त स्कूटर

देशात सर्वत्र इंधन दरवाढीचा भडका उठला आहे, मात्र असे असले तरी अनेक लोकांना अजूनही पेट्रोल बाईक चालविणे आवडते. अनेक लोकांना पेट्रोल स्कूटर खरेदी करायच्या असतात, जर आपणासही पेट्रोल स्कूटर खरेदी करायची असेल आणि कोणती स्कूटर मायलेज साठी सर्वोत्कृष्ट आहे याबद्दल आपण संभ्रमात असाल तर आज आम्ही खास आपल्यासाठी भारतातील सर्वात दमदार मायलेजच्या आणि स्वस्तात मिळणार्‍या स्कूटरची माहिती घेऊन आलो आहोत. आज आम्ही आपणास हिरो, होंडा, सुझुकी, यामाहा तसेच टीव्हीएस सारख्या नामांकित कंपनीच्या स्कूटरची माहिती घेऊन आलो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

देशात सर्वत्र इंधन दरवाढीचा भडका उठला आहे, मात्र असे असले तरी अनेक लोकांना अजूनही पेट्रोल बाईक चालविणे आवडते. अनेक लोकांना पेट्रोल स्कूटर खरेदी करायच्या असतात, जर आपणासही पेट्रोल स्कूटर खरेदी करायची असेल आणि कोणती स्कूटर मायलेज साठी सर्वोत्कृष्ट आहे याबद्दल आपण संभ्रमात असाल तर आज आम्ही खास आपल्यासाठी भारतातील सर्वात दमदार मायलेजच्या आणि स्वस्तात मिळणार्‍या स्कूटरची माहिती घेऊन आलो आहोत. आज आम्ही आपणास हिरो, होंडा, सुझुकी, यामाहा तसेच टीव्हीएस सारख्या नामांकित कंपनीच्या स्कूटरची माहिती घेऊन आलो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी.

हिरो मेस्ट्रो एज 110

भारतात टु व्हीलर सेगमेंटमध्ये हिरो मोटोकॉर्प एक नामांकित आणि प्रतिष्ठित कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीची हिरो मेस्ट्रो एज 110 एक सर्वात जास्त विक्री होणारी स्कूटर आहे. या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 67 हजार 249 ते 74 हजार 115 या दरम्यान असते. ही स्कूटर विशेष ग्राहकांच्या सोयीसाठी आठ कलर मध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. ही स्कूटर 110cc bs6 इंजिन सोबत देण्यात येते. ही स्कूटर 45 किलोमीटर प्रति लिटर पर्यंत मायलेज देण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे. या स्कूटरमध्ये फ्रंट आणि रियर अशा दोन्ही व्हील्स मध्ये डिस्क ब्रेक प्रोव्हाइड करण्यात आले आहे. 

हीरो प्लेजर प्लस

हिरो कंपनीची ही एक सर्वात जास्त विक्री होणारी स्कूटर आहे. ही स्कूटर आपल्या मायलेजसाठी विशेष प्रसिद्ध आहे. या स्कूटरला दमदार मायलेज असल्याने मध्यमवर्गीय लोकांची ही पहिली पसंत ठरत आहे. या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 63,238 ते 74 हजार 27 रुपयांच्या दरम्यान आहे. या स्कूटरला देखील हिरो कंपनीने 5 कलर व्हेरीयट मध्ये उपलब्ध करून दिले आहे. ही स्कूटर 110cc bs6 इंजिन सोबत ग्राहकांना देण्यात येते. ही स्कूटर जवळपास पन्नास किलोमीटर प्रति लिटर पर्यंत मायलेज देण्यात सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे. या स्कूटरमध्ये देखील मेस्ट्रो प्रमाणे फ्रंट आणि रियर दोन डिस्क ब्रेक देण्यात आले आहे .

होंडा एक्टिवा 6g

हिरो नंतर देशात सर्वात जास्त होंडा कंपनीच्या मोटार बाईक विक्री होत असतात. होंडा कंपनी देशातील अग्रगण्य मोटोकॉर्प कंपन्यांपैकी एक आहे. होंडाची होंडा एक्टिवा 6g एक दमदार मायलेज देणारी स्कूटर म्हणून विख्यात आहे. या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 70 हजार 857 अति 73 हजार 719 या दरम्यान कंपनीने ठेवली आहे. ही स्कूटर कंपनीने ग्राहकांच्या सोयीसाठी तब्बल आठ कलर मध्ये उपलब्ध करून दिली आहे. या स्कूटरला कंपनीने 110cc bs6 इंजिन प्रोव्हाइड केले आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, ही स्कूटर पन्नास किलोमीटर प्रतिलिटर मायलेज देण्यास सक्षम आहे. या स्कूटर मध्ये फ्रंटला आणि रियर डिस्क ब्रेक देण्यात आले आहे.

यामाहा फसिनो 125

हिरो आणि होंडा नंतर सर्वात जास्त यामाहा कंपनीच्या मोटार गाड्या विक्री होत असतात. यामाहा हि भारतातील एक प्रतिष्ठित मोटोकॉर्प कंपनी आहे. यामाहा कंपनीची यामाहा फसिनो 125 ही दमदार मायलेज देणारी स्कुटर आहे. या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 73,648 ते 80 हजार 862 या दरम्यान ठेवण्यात आली आहे. ही स्कूटर तब्बल 23 कलर मध्ये आणि सहा वेरीयंट मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. या स्कूटरला 125cc इंजिन कंपनीने प्रोव्हाइड केले आहे. कंपनीच्या मते, ही स्कूटर सुमारे पन्नास किलोमीटर प्रति लिटर पर्यंतचे मायलेज देण्यास सक्षम आहे. या स्कूटर मध्ये फ्रंट आणि रियर दोन्ही ठिकाणी डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.

सुजुकी एक्सेस 125 

सुजुकी एक्सेस 125 ही दमदार मायलेज देणारी एक स्कूटर आहे. सुझुकी देशातील एक अग्रगण्य मोटोकॉर्प कंपनी आहे. हि कंपनी आपल्या स्टायलिश लुक वाल्या मोटार गाड्यांसाठी प्रसिद्ध आहे. सुझुकी कंपनीची अक्सेस 125 स्कूटर 74 हजार 980 ते 84 हजार 133 या दरम्यान एक्स शोरूम किंमत मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. हि स्कूटर जवळपास दहा कलर मध्ये उपलब्ध असून सात वेरीयंत मध्ये कंपनीने प्रोव्हाइड केली आहे. या स्कूटरला 124 सीसी इंजिन कंपनीने दिले आहे. कंपनीच्या मते, ही स्कूटर 50 किलो मीटर प्रति लिटर पर्यंतचे मायलेज देण्यास सक्षम आहे. या स्कूटर मध्ये देखील इतर स्कूटर प्रमाणे फ्रंट आणि रियर दोन्ही ठिकाणी डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. 

English Summary: Want to buy a scooter? Then, find out the most powerful and affordable scooters in India Published on: 16 February 2022, 02:35 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters