मतदान हा आपला महत्त्वाचा अधिकार आहे.भारतामध्ये 18 वर्षापेक्षा पुढील व्यक्ती मतदान करू शकते.आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. तसेच अनेक राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत.
परंतु आपल्याला माहिती आहेस की मतदान करण्यासाठी आपल्याला मतदान ओळखपत्र असणे फार आवश्यक आहे. मतदान ओळखपत्र काढणे म्हणजे सरकारी कार्यालयाच्या खेटे मारावे लागतात. परंतु आत्ता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हे मतदार ओळखपत्र अगदी घरपोच मिळवूशकतात. मतदार ओळखपत्र ऑनलाइन पद्धतीने कसे काढतात याबद्दल या लेखात माहिती घेऊ.
मतदार ओळखपत्र साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?
जर तुमचे वय 18 वर्ष पेक्षा जास्त असेल तर तुम्ही मतदार ओळखपत्र साठी सहजरित्या अर्ज करू शकता. यासाठी तुमच्याकडे तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल आयडी आणि तुमचा अड्रेस प्रुफ असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊ शकता आणि त्यातून राष्ट्रीय सेवा पोर्टल https://nvsp.in/वरही जाऊ शकता. या साईटवर गेल्यानंतर तिथे नवीन मतदार म्हणून रजिस्टर वर क्लिक करावे लागेल आणि ती स्वतःची नोंदणी करून फॉर्म भरावा लागेल.
यासाठी आवश्यक कागदपत्रे
- ऍड्रेस प्रूफसाठी तुम्ही आधारकार्डची स्कॅन कॉफी, तुमच्या बँकेचे पासबुक, जन्माचे प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स,पासपोर्ट इत्यादी कागदपत्रे हॉटेल वर अपलोड करावे लागताततसेच तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो देखील आवश्यक असतो
तुम्ही या पोर्टल द्वारे मतदार ओळखपत्र साठी अर्ज केल्याच्या एक महिन्यानंतर तुमचे मतदार ओळखपत्र घरपोच येते. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. तुम्ही अगदी तुमच्या मोबाईल फोनवरून यासाठीचा अर्ज करू शकता. तसेच विशेष म्हणजे या साइटवरून अगोदरचे मतदार ओळखपत्र डाऊनलोड करू शकता.
Share your comments