
vivo v 25 smartphone
सध्या बाजारपेठेमध्ये आपण पाहत आहोत की विविध कंपन्यांचे उत्तम वैशिष्ट्य असलेले स्मार्टफोन लॉन्च होत आहेत. जर आपण स्मार्टफोनच्या बाबतीत ग्राहकांचा विचार केला तर प्रत्येकाची इच्छा असते की बजेट किंमतमध्ये चांगले वैशिष्ट्य असलेला स्मार्टफोन मिळणे हे होय. अशाच ग्राहकांसाठी विवो कंपनीने दिवाळीच्या तोंडावर 'विवो V 25' 5 जी स्मार्टफोनचे दोन प्रकारांमध्ये लॉंचिंग केले आहे. हा फोन दोन वेगवेगळ्या रंगांच्या ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.
या फोनची दोन प्रकार व किंमत
यामध्ये दोन प्रकार असून यातील 8 जीबी रॅम असलेल्या स्मार्ट फोनची किंमत 27 हजार 999 रुपये आहे. तर 12 जीबी रॅम असलेल्या स्मार्टफोनची किंमत 31 हजार 999 रुपये असणार आहे.
8 जीबी रॅम असलेल्या फोनची वैशिष्ट्ये
आठ जीबी प्रकारांमध्ये 4500 mAh लिथियम आयन बॅटरी असून, मोबाईल सर्फिंग ब्लू आणि एलिगंट ब्लॅक या दोन रंगांमध्ये हा फोन मिळणार आहे. 64 मेगापिक्सल, 8 मेगापिक्सल आणि 12 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा आणि 50 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा यामध्ये देण्यात आला आहे. या फोनमध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज असून याची किंमत 27 हजार 999 रुपये आहे.
12 जीबी रॅम असलेल्या फोनची वैशिष्ट्ये
या फोनमध्ये बारा जीबी रॅम असून 256 जीबी स्टोरेज आहे. या फोन मध्ये 50 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा सह 64 मेगापिक्सल नाईट विजन, 8 मेगापिक्सल आणि 12 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरे यामध्ये आहेत. यामध्ये 4500 mAh बॅटरी असलेला हा स्मार्टफोन 6.44 इंच फुल एचडी डिस्प्ले सोबत आहे.
या दोन्ही फोन सोबत यूएसबी पॉवर अडप्टर, युएसबी केबल, फोन कव्हर तसेच बॉक्समध्ये स्क्रीन गार्ड इत्यादी मिळणार आहे.
Share your comments