छोट्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी आर्थिक मदत केली जाते. वर्षाला ६ हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट टाकले जातात. परंतु या योजनेत बनावट लाभार्थींची संख्या वाढली आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांना या योजनेची गरज आहे, त्यांना या लाभ मिळत नाही. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकारने लाभार्थ्यांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पीएम किसान सम्मान निधी योजनेच्या लाभर्थ्यांची पडताळणी होत आहे. साधरण ३० ऑगस्टपर्यंत ही पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर अपात्र लाभार्थ्यांना योजनेच्या यादीतून हटविण्यात येणार आहे. इतकेच नाही पीएम किसान योजनेतील घेतलेला पैसाही शेतकऱ्यांकडून परत घेतला जाणार आहे. जर शेतकरी पैसे परत नाही देऊ शकले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे. पीएम किसान योजनेच्या नियमांनुसार प्रत्येक वर्षी योजनेतील ५ टक्के लाभार्थ्यांची पडताळणी केली जाते. यामुळे अर्जात देण्यात आलेल्या सर्व गोष्टी योग्य असल्याची काळजी घेतली पाहिजे.
पीएम किसान सम्मान निधी योजनेच्या नियमानुसार, जर आपली शेतजमीन ही शेती करण्यायोग्य आहे, पण आपण त्याचा उपयोग आपण दुसऱ्या गोष्टीसाठी करत आहात तर आपण या योजनेसाठी पात्र नाहीत. यासह जर आपल्या कुटुंबातील कोणी सदस्य नोकरी करत असेल तर आपण या योजनेसाठी आपण अपात्र ठरणार. जर आपण करदाते असाल तर आपण यासाठी अपात्र ठरू शकता.
दरम्यान यादीत आपले नाव आहे का? याची चौकशी आपण ऑनलाईन पद्धतीने करू शकता. पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीत तुमचे नाव असल्याची खात्री करून घेणे गरेजेचे आहे. यासाठी तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा https://pmkisan.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन फार्मर्स कॉर्नरवर जाऊन https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus.aspx या ठिकाणी माहिती घेऊ शकता.
Share your comments