भाजीपाला व फळे विक्री क्षेत्रात व्यवसायाच्या उत्तम संधी आहेत. या व्यवसायातील बलस्थान किंवा जमेच्या बाजू चा विचार केला तर गुणवत्ता, मालाची स्वच्छता आणि रसायनविरहित फळे आणि भाजीपाला चा पुरवठा या गोष्टी या व्यवसायात फार महत्वाचे आहेत. आपण पाहतो भाजीपाला विक्रेते शहरी भागात आपले भाजीपाला शॉप चांगल्या पद्धतीने सेट अप करून व्यवसायात चांगल्याप्रकारे प्रगती करीत आहेत. ग्राहकांचा ओढा या व्यावसायिकांकडे अधिक दिसतो. भाजीपाला ताजा, केमिकल विरहित आणि स्वच्छ असेल तर ग्राहक भावात घासाघीस न करता आपला माल विकत घेतो.
हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी
या व्यवसायाची सुरुवात करण्यापूर्वी भाजीपाला व फळे यांच्या मार्केटची माहिती करून घ्यावी. सगळ्यात अगोदर म्हणजे भाजीपाल्याचे दर कोणत्या पद्धतीत कमी-जास्त होतात व त्यावर आपला नफा कसा ठरवावा लागेल याची माहिती करून घेणे फार महत्त्वाचे असते. स्थानिक शेतकरी आणि बाजारपेठेतून ठोक भावात भाजीपाला फळे खरेदी करून किरकोळ मार्केटमध्ये त्याची विक्री करणे फायदेशीर असते. या व्यवसायात ग्राहक उत्तम असतो आणि ग्राहकांची कमतरता नसते. परंतु या व्यवसायात आपला स्वतःचा एखादा चांगला ब्रँड तयार करणे फार फायदेशीर ठरू शकते. भाजीपाल्यासाठी चांगला ब्रँड बनवून विक्री केल्यास चांगले मार्केट मिळेल. तसेच मार्केटिंगवर भर द्यावा. आपण राहतो त्या जवळच्या परिसरात होम डिलिव्हरी दिल्या शॉप सेटप ची गरज पडणार नाही तसेच कालांतराने जाहिरात झाल्यास संपूर्ण शहरभर होम डिलिव्हरी सुरु करता येईल.रिक्षा किंवा शिवाय कदम मालवाहू टेम्पो द्वारे चौकाचौकात किंवा स्टॅन्ड बनवून फिरत्या गाडीवरून विक्री करू शकता. दररोज एखाद्या चांगल्या परिसरातील मार्केटमध्ये काही तास थांबलात तरी चांगला धंदा होतो.
या व्यवसायातील गुंतवणूक
आपल्याला माहीतच आहे की हा व्यवसाय खूप कमीत कमी गुंतवणुकीत सुरू करता येऊ शकतो. अगदी तुमच्याकडे पाच ते दहा हजार रुपये असतील तर हा व्यवसाय सुरू करता येईल. तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे ब्रँडिंग करायचे असेल तर त्यासाठी 25 ते 30 हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे या व्यवसायातील बारकावे जर तुम्ही शिकलात तर या व्यवसायात चांगली प्रगती करू शकतात.
या व्यवसायातील प्रमुख वैशिष्ट्य
- हा व्यवसाय तुम्हाला जुना वाटेल परंतु यामध्ये देखील तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता.
- फळे व भाजीपाला विक्री हा व्यवसाय तुम्ही जेवढे जास्त कष्ट कराल तेवढे जास्त उत्पन्न तुम्हाला मिळवून देईल.
- सुरुवातीच्या काळात तुम्हाला या व्यवसायामध्ये जास्त पैसे गुंतवण्याची देखील आवश्यकता नसते.
- तुम्ही हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्या गावातील किंवा जवळच्या गावातील शेतकऱ्यांना कडून कांदा, बटाटे, वांगे म्हणजे बऱ्याच प्रकारचा भाजीपाला आणि शेतक-यांकडून फळे विकत घेऊ शकता किंवा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणच्या मार्केट कमिटी मधून तुम्ही भाजीपाला व फळे लिलावातून घेऊ शकतात.
- हा घेतलेला मालक व्यवस्थित विलगीकरण करून तुम्ही डायरेक्ट जिल्ह्याच्या मार्केटला देखील पाठवू शकतात किंवा एक गाडी घेऊन तर त्या स्वरूपात मोठ्या गावांच्या आठवडे बाजार देखील विकू शकतात .
Share your comments