सध्या आपण पाहतो की पेट्रोलचे दर शंभरी पार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती मागे केंद्र सरकारकडून आयातशुल्क आणि उत्पादन शुल्क त्यासोबतच राज्यसरकारांकडून व्हॅट, मालवाहतूक, डीलरचे मार्जिन इत्यादी प्रमुख कारणे आहेत. परंतु एवढ्या जास्त किमतीचे पेट्रोल आपण घेतो परंतु त्याचा दर्जा कसा आहे हेदेखील तपासणे गरजेचे आहे.
कारण पेट्रोलचा दर्जा जर चांगला नसेल तर त्याचा परिणाम थेट गाडीच्या इंजिनवर होऊन तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. या लेखामध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने घरी बसून पेट्रोलची गुणवत्ता कशी तपासावी, याबद्दल माहिती घेऊ.
नक्की वाचा:Market Situation:येणाऱ्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर उतरतील?कारण की….
अशा पद्धतीने तपासा पेट्रोलचा दर्जा
1- फिल्टर पेपरचा वापर- पेट्रोलचे गुणवत्ता तपासायची असेल तर त्यासाठी काही साधनांची आवश्यकता असते. घरी ही साधने आणणे इतके सोपे नाही. त्यासाठी तुम्ही फिल्टर पेपरचा वापर करून गुणवत्ता तपासून शकतात.फिल्टर पेपर बाजारात सहज उपलब्ध आहेत. पेट्रोलचे गुणवत्ता तपासण्यासाठी ही पद्धत सर्वांत सोपी मानली जाते.
नक्की वाचा:Agri Update: आता सातबारा झाला पारदर्शक, 46 प्रकारचे दोष महसूल विभागाने केले दूर
2- नोजलचा वापर करून- पेट्रोलचा दर्जा तपासणे पूर्वी वाहनाचे नोझल स्वच्छ करा. नोजल वर कोणतीही घाण राहू नये. नोझल मधून पेट्रोलचा एक थेंब फिल्टर पेपर वर टाका. काही वेळात पेट्रोल संपते. पेट्रोल फुंकल्यानंतर फिल्टर पेपरवर कोणताही डाग दिसत नसेल तर याचा अर्थ पेट्रोलची गुणवत्ता चांगली आहे.
परंतु फिल्टर पेपर वर कोणतीही घाण किंवा डाग दिसत असेल तर याचा अर्थ पेट्रोलचा दर्जा खराब आहे असे समजावे. या विरोधी तुम्ही संबंधित पेट्रोल पंपा विरुद्ध ग्राहक संरक्षण कोणाकडे तक्रार करू शकतात.
नक्की वाचा:Money Transfer: चुकून दुसरीकडे पैसे ट्रान्सफर झाले तर त्वरित करा
Share your comments