केंद्र सरकार भारतातील प्रत्येक नागरिकासाठी एक युनिक हेल्थ कार्ड तयार करत आहे. केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत हे कार्ड तयार करण्यात येणार आहे.भारतीय नागरिकांसाठी हे आरोग्य कार्ड अत्यंत उपयोगी ठरणार आहे. या कार्डच्या मदतीने देशातील काही मोजक्या रुग्णालयात उपचारांची सुविधा देण्यात आली आहे.
हे काल आधार कार्ड प्रमाणेच पूर्णता डिजिटल असून आधार क्रमांक याप्रमाणे या कार्डवर एक क्रमांक मिळणार आहे. या कार्डवर या क्रमांकामध्ये तुमच्या आरोग्य बाबतीत सर्व माहितीची नोंद असेल. याचा अर्थ फायदा असा होईल की डॉक्टरांना तुमच्या आरोग्याची रेकॉर्ड समजेल. जेणेकरून तुम्ही यापूर्वी कोणत्या आजारावर काय उपचार केला, कोणत्या प्रकारचे उपचार घेतले तर ते कोणत्या शस्त्रक्रिया केल्या आहेत याची इत्यंभूत माहिती डॉक्टरांना मिळेल.
या युनिक हेल्थ कार्ड मुळे तुमच्या आरोग्याची माहिती नोंद होते. त्यामुळे तुम्ही देशांमध्ये कुठेही गेलात आणि संबंधित हॉस्पिटल जर या योजनेच्या अंतर्गत येत असेल आणि तुमच्याकडे तुमच्या आजार आणि त्यावरील औषधोपचाराची माहिती असलेले फाईल नसेल तरीही डॉक्टरला तुमच्यावर सुरू असलेले उपचारांची, तुम्ही घेत असलेल्या औषधांची संपूर्ण माहिती अगदी काही सेकंदात मिळेल.
या कार्ड साठी ची नोंदणी
- जर तुम्हाला युनिक हेल्थ आयडी कार्ड तयार करायचे असेल तर http://www.healthid.ndmh.gov.inया सरकारी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागते.
- तुम्ही तुमच्या मोबाईलवर ABDM हे हेल्थ रेकॉर्ड ॲप डाउनलोड करू शकता. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही हेल्प आयडी कार्ड साठी नाव नोंदणी करू शकता. यामध्ये तुम्हाला तुमची महत्त्वपूर्ण माहिती नोंद करावी लागेल. तसेच तुमचा मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक देखील व्हेरिफिकेशन करावे लागेल.
- ऑनलाइन नोंदणी करायची असेल तर आधी नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन च्या संकेतस्थळाला भेट द
- त्यानंतर या संकेतस्थळावर क्रिएट युवर हेल्थ आयडी या पर्यायावर क्लिक करा. आधार कार्ड मार्फत कार्ड तयार करण्यासाठी आधार नंबर टाका. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्या फोन नंबर चे व्हेरिफिकेशन करा.
- त्यानंतर तुम्हाला 14 अंकाचा हेल्थ आयडी नंबर मिळेल.
- त्यानंतर आवश्यक ती माहिती भरा आणि सबमिट करा.
- त्यानंतर तुमचे हेल्थ आयडी तयार होईल.(संदर्भ-कृषिरंग)
Share your comments